आमीर खानच्या मराठी शिक्षकाचे निधन, ट्विटरवरुन जागवल्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 12:52 PM2020-09-03T12:52:29+5:302020-09-03T12:53:39+5:30
सर, आपण माझ्या आवडत्या शिक्षकांपैकी एक आहात. तुमच्यासोबत घालवेला प्रत्येक्ष क्षण मी आनंदाने जगलो आहे. शिकविण्याबद्दलची तुमची उत्सुकता आणि तीव्र इच्छा आपणाला एक उत्कृष्ट शिक्षक बनवते.
मुंबई - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असलेल्या आमीर खानने ज्यांच्याकडून मराठीचे धडे घेतले, त्या सुहास लिमये सरांचे निधन झाले आहे. लिमये सरांच्या निधनानंतर आमीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सरांसोबतच्या आठवणी जागवल्या आहेत. तसेच, आपल्या निधनामुळे मोठे दु:ख झाल्याचेही आमीरने म्हटले.
सर, आपण माझ्या आवडत्या शिक्षकांपैकी एक आहात. तुमच्यासोबत घालवेला प्रत्येक्ष क्षण मी आनंदाने जगलो आहे. शिकविण्याबद्दलची तुमची उत्सुकता आणि तीव्र इच्छा आपणाला एक उत्कृष्ट शिक्षक बनवते. आपण एकत्रितपणे घालवेले 4 वर्ष हे संस्मरणीय आहेत. माझ्या आठवणीत त्या 4 वर्षातील प्रत्येक क्षण मी जपला आहे. आपण मला केवळ मराठीच शिकवली नाही, तर इतरही अनेक धडे दिले आहेत. आपला सदैव आभारी, असे म्हणत आमीरने मराठी शिक्षक लिमये सरांना श्रद्धांजली वाहिली आहे.
— Aamir Khan (@aamir_khan) September 3, 2020
आमीर हा हिंदी सिनेमाचा सुपरस्टार हिरो आहे, तरीही तो चांगलं मराठी बोलता. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आमीरने महाराष्ट्रात मोठं काम उभारलं आहे. याच पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी आमीरने मराठी धडे गिरवले होते. त्यातून अस्सल मराठी भाषा आमीर शिकला आहे. अनेक कार्यक्रमात आमीरने मराठीतून बोलल्याचं आपण पाहिलं आहे. चला हवा येऊ द्या... या विनोदी कार्यक्रमाताही आमीरची मराठी महाराष्ट्राने ऐकली व पाहिली आहे.