दुष्काळ निवारणासाठी आमिर खानचे श्रमदान
By Admin | Published: May 5, 2016 02:59 PM2016-05-05T14:59:06+5:302016-05-05T14:59:06+5:30
पाणीसंकट आणि दुष्काळाच्या झळांमुळे राज्यातील नागरिक हवालदील झाले आहेत. विविध पातळयांवर दुष्काळ निवारणासाठी उपाय केले जात आहेत.
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. ५ - पाणीसंकट आणि दुष्काळाच्या झळांमुळे राज्यातील नागरिक हवालदील झाले आहेत. विविध पातळयांवर दुष्काळ निवारणासाठी उपाय केले जात आहेत. यात आता चित्रपट अभिनेता आमिर खान हा देखील सहभागी झाला आहे. त्याने गुरुवारी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वाठोडा या गावाला भेट दिली.
आमीर खानसोबत अभिनेत्री रिमा लागू, अनिल भटकल, सई ताम्हणकर, सुनिल बर्वे हेदेखील होते. विदर्भातील अनेक शेतक-यांनी निसर्गाची अवकृपा आणि कर्जाच्या ओझ्यामुळे त्रासून आत्महत्या केली आहे. राज्यात पाणी फाऊंडेशनतर्फे ‘वॉटर कप’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत वरुड तालुक्याचादेखील समावेश आह. दुष्काळ निवारणाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे संकेत आमीर खानने अगोदरच अशा दिले होते. आता वरुड येथे पोहोचून यात प्रत्यक्ष सहभागी झाला आहे. या मोहिमेदरम्यान आमिरने गावक-यांसोबत श्रमदान केले.