‘आॅनर किलिंग’मधील आरोपीला कोठडी
By Admin | Published: September 21, 2016 05:31 AM2016-09-21T05:31:24+5:302016-09-21T05:31:24+5:30
पत्नी प्रिया उर्फ सुफिया (२२) यांच्या हत्याकांडातील आरोपी शफीक मन्सूरी (२८) याला २८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे : डायघर येथील विजयशंकर यादव (३५) आणि त्याची पत्नी प्रिया उर्फ सुफिया (२२) यांच्या हत्याकांडातील आरोपी शफीक मन्सूरी (२८) याला २८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे ठाणे न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास आता डायघर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
डायघर भागात १२ सप्टेंबर रोजी झालेल्या या दुहेरी हत्याकांडाचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने तपास करून शफीकला उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील पलिया गावातून अटक केली होती. आंतरधर्मीय विवाहाला सुफियाच्या घरातून विरोध असल्यानेच हे हत्याकांड घडविले. आतै हे प्रकरण पुन्हा डायघर पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शफीकला यात कोणी मदत केली? त्याने ज्या चाकूने हे हत्याकांड घडविले त्याचाही शोध घेणार असल्याचे डायघर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. काटकर यांनी सांगितले. शफीकचा ताबाही आता गुन्हे अन्वेषण विभागाकडून डायघर पोलिसांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)