‘आप’ फाडणार उमेदवारांचा बुरखा
By admin | Published: September 30, 2014 02:07 AM2014-09-30T02:07:34+5:302014-09-30T02:07:34+5:30
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची खरी माहिती लोकांर्पयत पोहचवून त्यांना जागृत करण्याचे काम आम आदमी पक्ष करणार आह़े
Next
>पुणो : निवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रतून सर्व खरी माहिती पुढे येतेच असे नाही़ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची खरी माहिती लोकांर्पयत पोहचवून त्यांना जागृत करण्याचे काम आम आदमी पक्ष करणार आह़े
लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार आप प्रत्यक्ष निवडणुक न लढविता या काळात संघटन मजबूत करण्याचे काम करणार आह़े
याबाबत आपच्या पुण जिल्हा सचिव आभा मुळे म्हणाल्या, प्रत्यक्ष निवडणूक न लढविण्याची आपची भूमिका असली तरी या काळात मतदार जागृती मोहिम राबविण्यात येणार आह़े
उमेदवारी अर्जाबरोबर प्रत्येकाला आपली मालमत्ता आणि गुन्हेगारीविषयीचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागत़े निवडणुक आयोगाला सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रचा आधार घेऊन उमेदवारांनी खरी माहिती दिली आहे का? हे तपासून पाहून ती समग्र माहिती लोकांर्पयत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाईल़ त्यासाठी काही पथनाटय़ तयार करण्यात येणार आह़े ते कोप:या कोप:यावर सादर करुन लोकांर्पयत पोहचविली जाईल़ पत्रके काढून घरोघरी पोहचविणार आहोत़
कोणती व्यक्ती अथवा पक्षाला यात लक्ष्य न करता सर्व प्रमुख राजकीय पक्षांची माहिती लोकांर्पयत पोहचविणार आहोत़ त्यातून लोकांनी गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसणा:या, लोकांना त्यांची कामे करेल, अशा उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले जाईल़ त्याचबरोबर मतदान आवश्यक करा, यासाठी प्रयत्न केला जाईल़ सर्व उमेदवारांपैकी कोणीही पसंत नसेल तरी मतदान करा, तुम्हाला नोटाचा पर्याय आह़े पण आवश्यक मतदान करा, यावर जनजागृतीत भर देण्यात येणार आह़े