‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा,’ बाळासाहेब-राज ठाकरेंच्या फोटोसह ट्वीट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 08:43 AM2022-07-25T08:43:46+5:302022-07-25T08:45:44+5:30
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केली.
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केली. शिवसेनेच्या तब्बल चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. हिंदुत्व आणि भाजपशी युतीच्या मुद्द्यावर आमदारांनी बंडखोरी केली. दरम्यान, यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. “अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा,” असं ट्वीट देशपांडे यांनी केलं आहे. त्यांनी ट्वीट करत अप्रत्यक्षरित्या शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.
अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा pic.twitter.com/2QxhYD8OeR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 25, 2022
उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं पक्षप्रमुख बनवण्याचा किस्सा बाळासाहेब ठाकरे यांनीही सांगितला होता. २०१९ मध्ये निवडणुकीत शिवसेना भाजपमध्ये झालेल्ल्या सत्ता स्थापनेच्या वादानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. परंतु आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.