Abdul Sattar Supriya Sule, Chitra Wagh: "ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच, पण..."; सत्तार-सुप्रिया सुळे वादावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 05:15 PM2022-11-07T17:15:56+5:302022-11-07T17:17:23+5:30

संजय राऊतांनी कंगना रानौतसाठी वापरलेल्या शब्दांचीही करून दिली आठवण

Abdul Sattar Supriya Sule controversy BJP female leader Chitra Wagh gives her expressive reaction | Abdul Sattar Supriya Sule, Chitra Wagh: "ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच, पण..."; सत्तार-सुप्रिया सुळे वादावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Abdul Sattar Supriya Sule, Chitra Wagh: "ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच, पण..."; सत्तार-सुप्रिया सुळे वादावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

googlenewsNext

Abdul Sattar Supriya Sule: महाराष्ट्राचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्या तोंडून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना एक अपशब्द उच्चारला गेला. ५० खोकेंबद्दल होणाऱ्या टीकेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना जाहीर मुलाखतीत त्यांनी अपशब्दाचा वापर केला. सत्तार यांच्या या शब्दामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यभरात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी देखील तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या दरम्यान भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची बाजू मांडली.

चित्रा वाघ म्हणाल्या...

"महिलांचा अवमान करणं किंवा महिलांबद्दल अपशब्द उच्चारणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे केवळ अब्दुल सत्तारच नव्हे तर कोणत्याही नेतेमंडळींनी असे शब्द वापरू नयेत असे माझे मत आहे. पण ही सारी घटना झाली त्याचं कारण ५० खोकेंवरून केली जाणारी टीका. '५० खोके सत्तारांकडे आहेत, त्यातले त्यांनी मला द्यावेत' असं बोलून राज्यभरात या आमदारांच्या विरोधात राळ उठवली जात आहे. त्यां आमदारांना अपमानित करण्याचं काम सुरू आहे. या साऱ्याचा राग म्हणून आलेले ते प्रत्युत्तर आहे. महाविकास आघाडीचे नेते महिलांचा अपमान करत होते. संजय राऊतांनी कंगना रानौतबद्दल हरामXX म्हणण्याइतकी मजल मारली होती. हे सारे आमच्या लक्षात आहे. पण तरीही शिंदे-फडणवीसांच्या सरकारमधील मंत्री, नेते किंवा पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये," असे स्पष्ट शब्दांत चित्रा वाघ म्हणाल्या.

अब्दुल सत्तारांकडून वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण

सुप्रिया सुळेंबद्दल वापरण्यात आलेल्या शब्दांनंतर राष्ट्रवादीसह राज्यभरातून सत्तारांवर टीका झाली. या विरोधानंतर सत्तारांनी माफी मागितली आणि स्पष्टीकरण दिले. माध्यमांशी संवाद साधताना अब्दुल सत्तार म्हणाले, "मी कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. आमची तशी संस्कृती नाही. माझ्या वाक्यामध्ये सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द नाहीत. मी आमच्यावर टीका करणाऱ्यांना तो शब्द वापरला आहे. तरीदेखील कोणत्या महिलेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी सॉरी म्हणतो."

राष्ट्रवादीकडून तीव्र विरोध

अब्दुल सत्तारांनी 24 तासांत माफी मागावी, असा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. यांना 50 खोक्यांची मस्ती आली आहे, यांची मस्ती उतरवली जाईल, असं राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटले होते. तसेच, 'दहा पक्ष बदलणारे सत्तार हे सत्तार आहेत की सुतार आहेत. सत्तेची मस्ती आलीय, ही मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवेल. सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देण्यात आला होता.

Web Title: Abdul Sattar Supriya Sule controversy BJP female leader Chitra Wagh gives her expressive reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.