आबांची अंजनी पोरकी झाली

By admin | Published: February 16, 2015 11:24 PM2015-02-16T23:24:12+5:302015-02-16T23:26:11+5:30

कार्यकर्त्यांची धाव : गावातील व्यवहार बंद

Abe's Anjani became a porkey | आबांची अंजनी पोरकी झाली

आबांची अंजनी पोरकी झाली

Next

सावळज : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाचे वृत्त येऊन धडकताच त्यांच्या गावी अंजनी येथे शोककळा पसरली. तासगाव पूर्व भागातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. त्यांचे बंधू सुरेश पाटील यांच्या गळ्यात पडून कार्यकर्ते भावनांना वाट मोकळी करून देत होते. आर. आर. आबांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. त्यांच्या निवासस्थानी बंधू सुरेश पाटील व इतर नातेवाईक होते. त्यांनाही मोठा धक्का बसला होता. निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्ते हंबरडा फोडत सुरेश पाटील यांच्या गळ्यात पडून रडत होते. नेहमीच आबांच्या आगमनाने त्यांचे निवासस्थान गर्दीने फुलले होते. पण यावेळी मात्र त्या गर्दीवर शोककळा पसरली होती.
सायंकाळी माजी मंत्री मदन पाटील, आमदार अनिल बाबर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन नातेवाईक व कार्यकर्त्यांचे सांत्वन केले. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, शिराळ्यातील मांगले, आळसंद या गावातही बंद ठेवून आदराजंली वाहिली. (वार्ताहर)

तासगावात साडेसहा वाजता अंत्ययात्रा
उद्या मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता तासगाव येथील भिलवडी नाक्यातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तासगावातील मार्केट कमिटी व अंजनीतील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता अंजनी-वडगाव रस्त्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Abe's Anjani became a porkey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.