‘एमपीएससी’ परीक्षेत अभिजित नाईक प्रथम
By Admin | Published: April 6, 2016 05:19 AM2016-04-06T05:19:38+5:302016-04-06T05:19:38+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१५ चा निकाल जाहीर झाला असून त्यात त्यात उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत अभिजित नाईक यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१५ चा निकाल जाहीर झाला असून त्यात त्यात उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत अभिजित नाईक यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. रवींद्र राठोड यांनी द्वितीय तर अतुल पंडित यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
पोलीस उपअधीक्षक पदाच्या परीक्षेत राहुल धस यांनी प्रथम, मिलिंद शिंदे यांनी द्वितीय आणि कुणाल सोनवणे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध पदांच्या परीक्षांचा मंगळवारी रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. मात्र, संकेतस्थळावर निकाल उपलब्ध झाला नव्हता. संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने अनेकांना निकाल पाहता आला नाही.
उपजिल्हाधिकारी परीक्षेत मुलींमध्ये सुहसिनी गोणेवार (प्रथम), स्नेहा उबाळे (द्वितीय), प्रियंका आंबेकर (तृतीय), शक्ती कदम (चौथा), विठ्ठल कदम (पाचवा), उमाकांत पंडित (सहावा) यांनीही यश मिळविले. (प्रतिनिधी)