मोठा गौप्यस्फोट! मॉरिस नरोना चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्रांना भेटला; राऊतांकडून फोटो पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 11:09 PM2024-02-08T23:09:05+5:302024-02-08T23:10:07+5:30

Abhishek Ghosalkar News: संजय राऊत यांनी मोरिस व एकनाथ शिंदे यांचा भेटतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

Abhishek Ghosalkar Firing News: Mauris Noronha met the CM Eknath Shinde at Varsha Bungalow four days ago; Photo post by Sanjay Raut | मोठा गौप्यस्फोट! मॉरिस नरोना चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्रांना भेटला; राऊतांकडून फोटो पोस्ट

मोठा गौप्यस्फोट! मॉरिस नरोना चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्रांना भेटला; राऊतांकडून फोटो पोस्ट

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची स्वयंघोषित नेता मॉरिस नरोना याने फेसबुक लाईव्हवेळी गोळ्या झाडून हत्या केली आहे. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खळबळजनक आरोप केला आहे. 

संजय राऊत यांनी मॉरिस व एकनाथ शिंदे यांचा भेटतानाचा फोटो पोस्ट केला आहे. नरोना हा चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर गेला होता. तिथे शिंदे यांनी त्याला आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. 

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस नरोना चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर गेला होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. मॉरिस याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले! (वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्याने अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. 

यापूर्वी राऊत यांनी राज्य सरकारवर टीका करणारे ट्विट केले आहे. महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा रोज गुंड टोळ्याना भेटत आहेत. पक्षात प्रवेश देत आहेत. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला आहे. 

Web Title: Abhishek Ghosalkar Firing News: Mauris Noronha met the CM Eknath Shinde at Varsha Bungalow four days ago; Photo post by Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.