पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासातून अबोलीचे गुणांचे ‘शतक’
By admin | Published: June 14, 2017 12:26 AM2017-06-14T00:26:19+5:302017-06-14T00:26:19+5:30
बहुसंख्य विद्यार्थी दहावीचा अभ्यास करण्यासाठी विविध गाईड्स, नोट्स यांचा आधार घेतात. परंतु यंदाच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बहुसंख्य विद्यार्थी दहावीचा अभ्यास करण्यासाठी विविध गाईड्स, नोट्स यांचा आधार घेतात. परंतु यंदाच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या दादरच्या बालमोहन विद्यामंदिरच्या अबोली बोरसे हिने मात्र फक्त शालेय पाठ्यपुस्तकांचाच अभ्यास करून परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे.
अबोलीने सांगितले, ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मला मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु, १०० टक्के हा माझ्यासाठी अनपेक्षित निकाल आहे. मी नववीची परीक्षा झाल्यानंतर लगेच दहावीचा अभ्यास सुरू केला. मी वर्षभर दररोज चार तास अभ्यास केला. मी गाईड्स, नोट्स यांचा वापर केला नाही. प्रश्नपत्रिका कितीही अवघड असली तरी परीक्षेला पाठ्यपुस्तकाबाहेरचा प्रश्न विचारला जाणार नाही, त्यामुळे सर्वांनीच पाठ्यपुस्तकावरच भर द्यायला हवा, असे तिने सांगितले.