अभ्युदय बँकेला १.३१ कोटींचा गंडा
By admin | Published: February 26, 2016 02:04 AM2016-02-26T02:04:04+5:302016-02-26T02:04:04+5:30
खोटी कागदपत्रे सादर करून अभ्युदय बँकेला तब्बल एक कोटी ३१ लाख ६० हजारांचा चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी कल्याण आणि
कल्याण : खोटी कागदपत्रे सादर करून अभ्युदय बँकेला तब्बल एक कोटी ३१ लाख ६० हजारांचा चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी कल्याण आणि उल्हासनगरच्या ६ जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून अद्याप कुणीही हाती लागले नसल्याने पोलीस पुरते हैराण झाले आहेत.
समीर चमनसिंग भगवाने (प्रो.मे. मुस्कान जीन्स, विठ्ठलवाडी स्टेशनजवळ), समीरची पत्नी नंदिनी ऊर्फ रु ची भगवाने, रवी कालिचरण वाल्मीकी (प्रो. महादेव टेक्स्टाइल्स, उल्हासनगर-४), सुनील शेषराव, राजेंद्र हरिसिंग भरोदिया (रा. मुलुंड-८०), मे. निरंकारी बियरिंग अॅण्ड ट्रान्समिशन प्रॉडक्ट्स (उल्हासनगर ३) अशी आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात बँकेचे वरिष्ठ निरीक्षक स्टॅनिश्लोस इग्नेशियन अगेरा (५३) यांनी कागदोपत्री पुराव्यांसह बुधवारी सायंकाळी तक्र ार दाखल केली.
या सर्वांनी मिळून बँकेच्या मलंग रोडला असलेल्या शाखेत खोटी कागदपत्रे सादर करून ती खरी असल्याचे भासवून कर्ज घेतले. हा व्यवहार ८ आॅगस्ट २०११ पासून ते २६ नोव्हेंबर २०१३ पर्यंत करण्यात
आला. पोलीस खात्याने या सर्व आरोपींना अटक करण्यासाठी
सपोनि एम.एस. माने यांचे पथक
तयार केले असून अधिक तपास सुरू आहे.