अभंगाने दिला जगण्याला आधार

By Admin | Published: July 28, 2016 07:05 PM2016-07-28T19:05:13+5:302016-07-28T19:05:13+5:30

दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या एका वृद्धाला अभंगातून जगण्याचा आधार मिळाला.

Aboriginal support | अभंगाने दिला जगण्याला आधार

अभंगाने दिला जगण्याला आधार

googlenewsNext

नीलेश शहाकार/ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 28 - जिभेवर रुळलेले संताचे अभंग व सुरेख आवाज, या दोन्ही गुणांची सांगड घालत, दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या एका वृद्धाला अभंगातून जगण्याचा आधार मिळाला. संजय ऐडके वृद्धाचे नाव असून, जवळपास २६ वर्षापासून म्हणजे १९९० पासून शहरातील बसस्थानक परिसरात संतांचे समाजप्रबोधन करणारे अभंग गातांना नागरिकांनी त्यांना पाहिले आहे. संजय ऐकडे हे खेरडी गावातील रहीवाशी असून त्यांना अंधत्व आल्यानंतर अनेक संकटाला समोरे जावे लागले. यावर मात करुन ईश्वरभक्ती व अभंगाची कास धरली. अन् अभंग गायनातून आपल्या संसाराचा गाढा रेटला. विशेष म्हणजे, मी एकाही शासकीय योजनेचा लाभ घेतला नाही, अभंग गायनातून जे काही मिळते, त्यातून माझा उदर्निवाह होतो, असे संजय ऐकडे यांनी सांगितले.

Web Title: Aboriginal support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.