२५ ते २९ वयोगटातील तरुणींमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढतेय

By admin | Published: May 13, 2017 01:37 AM2017-05-13T01:37:26+5:302017-05-13T01:37:26+5:30

कुटुंबनियोजनाविषयी सर्व स्तरांवर जनजागृती होऊनही गर्भपाताचा पर्याय स्विकारणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढते आहे. वेगवेगळ््या

Abortion rates increase among young people between the ages of 25 to 29 | २५ ते २९ वयोगटातील तरुणींमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढतेय

२५ ते २९ वयोगटातील तरुणींमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढतेय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुटुंबनियोजनाविषयी सर्व स्तरांवर जनजागृती होऊनही गर्भपाताचा पर्याय स्विकारणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढते आहे. वेगवेगळ््या स्तरातील आणि वयोगटातील तरुणी व महिला अशा वर्गवारीत २००७ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत तब्बल २ लाख ६४ हजार ५१० गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार २५ ते २९ वयोगटातील तरुणींमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबई शहर -उपनगरांतील अधिकृत गर्भपात केंद्रांवरील गर्भपाताची नोंद महापालिकेकडे असते. त्यात १२ आठवड्यांपूर्वी, १२ आठवड्यानंतर, वैवाहिक, अविवाहित, १५ वषार्खालील अशा सर्व गर्भपातांचा समावेश असतो. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारान्वये ही माहिती मागितली होती. त्यानुसार २०१४ मध्ये १२ आठवड्याच्या गर्भपातांची संख्या १३९६ तर २०१५मध्ये १३२९ संख्या असल्याचे आकडेवारी सांगते.
१२ आठवड्यातील गर्भपात करण्यात आलेल्या तरुणींची संख्या २०१४ मध्ये २८ हजार ५५४ होती, तर २०१५ मध्ये ३२ हजार ७२५ एवढी होती. तर १२ आठवड्यानंतर झालेले गर्भपाताची संख्या २०१४ आणि २०१५ मध्ये अनुक्रमे १३९६, १३२९ एवढी होती. मुंबईत २००७ मध्ये २९ हजार ११६ गर्भपात झाले, तर ६४ मातामृत्यू झाले. तर २००८ साली २४ हजार १७६ गर्भपात झाले व ८१ मातामृत्यू झाले. २००९ साली १६ हजार ७७३ गर्भपात आणि १४९ मातामृत्यूंची नोंद झाली. २०१० साली २० हजार ७६० गर्भपात तर २०६ मातामृत्यू झाले. २०११ मध्ये १९ हजार ७०१ गर्भपात आणि २२२ मातामृत्यू झाले.
२०१२ साली २५ हजार ३७४ गर्भपात व २५९ मातामृत्यू झाले. तर २०१३ साली ३० हजार ११७ व २७८ मातामृत्यू झाले. २०१४ साली ३० हजार ७४२ गर्भपात आणि २७६ मातामृत्यू झाले. तर २०१५ साली ३४ हजार ७९० गर्भपात आणि ३०० मातामृत्यू झाले. २०१६ साली ३२हजार ९१६ गर्भपात झाले, तर यावर्षींची मातामृत्यूची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे पालिकेने सांगितले.

Web Title: Abortion rates increase among young people between the ages of 25 to 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.