कुंभमेळ्यातील ५०% लोकांमध्ये मौखिक व्रण
By admin | Published: June 13, 2017 01:08 AM2017-06-13T01:08:51+5:302017-06-13T01:08:51+5:30
गेल्यावर्षी नाशिक येथील कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या दंतचिकित्सा तपासणीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या तपासणीत प्री-मालिग्नट लेसन म्हणजेच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्यावर्षी नाशिक येथील कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या दंतचिकित्सा तपासणीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या तपासणीत प्री-मालिग्नट लेसन म्हणजेच अत्यंत धोकादायक असे मौखिक व्रण ५० टक्के लोकांमध्ये आढळले आहेत. त्यात कर्करोगसदृश व्रण तब्बल १५ ते १८ टक्के लोकांमध्ये दिसून आले आहेत.
ज्या रुग्णांची तपासणी केली; त्यांतील तब्बल ७० टक्के रुग्णांच्या तोंडात व्रण आढळले आहेत. त्यात लायकन प्लीनस आणि कॅन्डीडाएसीस म्हणजे धोकादायक चट्टे आणि पुरळ यांचे प्रमाण फार मोठे होते. त्याशिवाय तंबाखूतील रासायनिक पदार्थांमुळे होणाऱ्या जखमा आणि व्रणही मोठ्या प्रमाणावर तोंडामध्ये झाल्याची प्रकरणे समोर आली.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि हार्वर्ड स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभमेळा दक्षता प्रकल्प राबवताना ही तपासणी करण्यात आली. इंडियन हेल्थ असोसिएशन (आयडीए) या संस्थेने नाशिक येथील एमजीव्ही डेंटल कॉलेजच्या सहकार्यातून हा उपक्रम हाती घेतला होता.
ज्यांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यातील साधारण ८० टक्के लोकांमध्ये एक किंवा अधिक वाईट सवय असल्याचे आढळून आले. त्यांत तंबाखू, चरस किंवा गांजा यांच्या सेवनाच्या सवयी पुढे आल्या आहेत. यातील कित्येकांमध्ये दाताचे रोग आढळून आले.
- डॉ. अशोक ढोबळे, मानद सरचिटणीस, इंडियन हेल्थ असोसिएशन