पुण्याविषयी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आकस
By admin | Published: August 17, 2015 12:41 AM2015-08-17T00:41:49+5:302015-08-17T00:41:49+5:30
मेट्रोसाठी पुण्याचा प्रस्ताव अगोदर असूनही तो रेंगाळत ठेऊन नागपूरला मेट्रोचे भूमिपूजन केले, स्मार्ट सिटी योजनेमध्ये पुणे व पिंपरीचा एकत्र समावेश केला.
पुणे : मेट्रोसाठी पुण्याचा प्रस्ताव अगोदर असूनही तो रेंगाळत ठेऊन नागपूरला मेट्रोचे भूमिपूजन केले, स्मार्ट सिटी योजनेमध्ये पुणे व पिंपरीचा एकत्र समावेश केला. पुण्यावर सतत अन्याय होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये पुण्याविषयी आकस असल्याचे यावरून स्पष्ट होते अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
एका परिसंवादामध्ये चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांवरील ताण कमी करण्यासाठी १० लाख लोकसंख्येची छोटी शहरे निर्माण करावीत. नवी मुंबई हे याचे उत्तम उदाहरण आहे.
स्मार्ट सिटीत पीपीपी तत्त्वावर प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे, मात्र पीपीपी योजनेचा अनुभव वाईट आहे. एक कंपनी स्थापन करून त्यामार्फत ही योजना राबविली जाणार आहे. त्याच्या सीईओचे काय अधिकार असतील? पालिकांचे आयुक्तांची भूमिका याबाबत
अस्पष्टता आहे असे चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)