अबब... घरकुल गेले चोरीला

By admin | Published: November 11, 2016 07:26 PM2016-11-11T19:26:52+5:302016-11-11T19:26:52+5:30

१६ वर्षापुर्वी शासनाच्या घरकुल योजनेतून घर बांधून मिळाले आहे. तशी नोंद ग्रामपंचायतीला सुध्दा आहे. मात्र सदर घर आपल्याला मिळाले नसून ते चोरीला

Above ... the house is stolen | अबब... घरकुल गेले चोरीला

अबब... घरकुल गेले चोरीला

Next
>ऑनलाइन लोकमत/किशोर मापारी
लोणार, दि.11 - १६ वर्षापुर्वी  शासनाच्या घरकुल योजनेतून घर बांधून मिळाले आहे. तशी नोंद ग्रामपंचायतीला सुध्दा आहे. मात्र सदर घर आपल्याला मिळाले नसून ते चोरीला गेल्याची अफलातून तक्रार तालुक्यातील गंधारी येथील  सखाराम वामन
चोटान यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.  दरम्यान गंधारी या गावामध्ये आजपर्यत ग्रामपंचायत मार्फत वाटप करण्यात आलेल्या घरकुलाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनात  केली
आहे.
प्रत्येक नागरिकास हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने  दारिद्रय रेषेच्या कुंटुबाना घरकुल योजना सुरू केली. या माध्यमातुन ग्रामपातळीवर अर्ज केल्यानंतर हा अर्ज पंचायत समिती मार्फत  जिल्हा परिषेदेकडे पाठविण्यात येतो त्यानंतर मंजुर होउन आलेल्या व्यक्तीस या घरकुलाचा लाभ मिळतो. मात्र लोणार तालुक्यात असे न होता परस्पर अर्ज करून त्या व्यक्तीच्या नांवाने
मिळालेले घरकुल दुस-या व्यक्तीस पैसे घेउन विक्री करण्याचा फंडा उघड झाला आहे. गंधारी गावातील सखाराम वामन चोटान यांना राहण्यासाठी घर नसल्यामुळे शासनाकडुन आलेल्या घरकुल योजनेसाठी सर्व कागदपत्रे  व अर्ज घेउन
ग्रामपंचायत कार्यालय गंधारी येथे गेले  असता ग्रामसेवक पि. बी . घुगे यांनी घरकुलचा अर्ज घेण्यास नकार दिला. यावर चोटान यांनी विचारणा केली असता ग्रामसेवक यांनी सांगीतले की तुला सन १९९९ -२००० मध्ये घरकुल मिळालेले आहे. तु पुन्हा अर्ज करू शकत नाही. हे ऐकुन चोटान यांना धक्काच बसला . आपण कधीही घरकुल लासाठी कोठेही अर्ज केला नाही किंवा यापुर्वी
कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतला नसताना  आपल्या नांवावर घरकुल असल्याची नोंद ग्रामपंचायत ला कशी?  जर मला घरकुल मिळाले तर ते घरकुल कुठे आहे? असा प्रश्न सखाराम चोटान यांनी  करताच  ग्रामसेवक व ग्रामपंचायत शिपाई यांनी चोटान यांना शिवीगाळ करून कार्यालयातुन हाकलून दिले. एवढेच नव्हे तर तुझ्या नांवाचा खोटा रिपोर्ट देउन सरकारी कामात अडथळा आनल्या प्रकरणी तुझ्यावर गुन्हा दाखल करू अशी धमकी सुध्दा दिली.
गंधारी गावामध्ये झोपडपटटी तसेच घरकुल योजनेमध्ये मोठा भष्ट्राचार झाला असून अनेक ख-या लाभार्थ्यांना घरकुल मिळाले नाही. मात्र प्रत्यक्षात शासन दरबारी त्याना घरकुल मिळाल्या असल्याची नोंदी आहेत. तथापि  प्रत्यक्षात अशा व्यक्तीस मिळालीच नाही. यामध्ये तत्कालीन ग्रामसेवक  यांच्या संगमताने यामध्ये मोठा भ्रष्ट्राचार  करून  शासनाची व  लाभार्थ्यांची
फसवणुक केल्याचे समोर आले आहे.   दरम्यान या प्रकरणाची सखोल माहीती घेण्यासाठी माहीतीच्या अधिकारात घरकुल योजनेची तसेच गाव नमुना आठ अ ची मागणी ग्रामसेवक पि. बी. घुगे यांचेकडे  केली असता ग्रामसेवकाने माहीती
देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर सखाराम वामन चोटान यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून घरकुल  मध्ये घोटाळा करण्याºयावर कडक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

Web Title: Above ... the house is stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.