अस्वच्छता दूर सारत पाणीपुरी, दहीपुरी खा बिनधास्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 05:54 AM2019-04-07T05:54:21+5:302019-04-07T05:54:34+5:30
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे संशोधन । पुऱ्या भरण्यासाठी हातांऐवजी आॅटोमेटीक वेंडिंग मशिनचा वापर
- सीमा महांगडे
मुंबई : पाणीपुरी, दहीपुरी म्हटले की, तोंडाला पाणी सुटते. परंतु, स्ट्रीट चाट म्हणून प्रसिद्ध असलेले हे चटपटीत खाद्यपदार्थ अस्वच्छ हाताळणीमुळे आरोग्याला हानिकारक ठरतात, हे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळेच स्वच्छता राखत जिभेचे चोचले पुरविण्यासाठी वांद्रे येथील रॉड्रिग्ज कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी पाणीपुरी, दहीपुरीसाठी वेंडिंग मशिनचे संशोधन केले आहे. यामुळे हे पदार्थ बनविताना वेळ वाचेल, शिवाय स्वच्छ प्रक्रियेतून बनविलेले पदार्थ खात असल्याचा अनुभव घेता येणार असल्याच्या प्रतिक्रिया या संशोधनात सहभागी विद्यार्थ्यांनी दिल्या.
आयआयटी ई यंत्रा २०१९च्या अंतिम स्पर्धेतील २१ प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. रॉड्रिग्ज कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या पंकज घार्गे, प्रांजली भोपटे, मोहम्मद अहमद भाटी, अनुजा इंदोरे या इलेक्ट्रॉनिक्सच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले. यासाठी प्राध्यापक वैभव गोडबोले यांनी त्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेंडिंग मशिनमध्ये कॉइन टाकल्यानंतरच ती सुरू होते. मशिनच्या वरच्या भागात रगडा, विविध प्रकारचे पाणी, दही या साऱ्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, खालच्या भागाशी ही मशिन विविध पाइपद्वारे जोडण्यात आली आहे. खालच्या भागात तबकडीसारखी एक चकती आहे. यामध्ये पाणीपुरी किंवा दहीपुरीच्या पुºया ठेवण्याची व्यवस्था आहे. चकतीला आवश्यक त्या प्रेशरवर फिरविल्यास व वरच्या भागातील हवे त्या पदार्थाचे बटन दाबल्यास पुºया भरण्याची प्रक्रिया सुरू होते. पुºया भरल्यानंतर मशिनमध्ये अलार्म नोटीफिकेशन मिळते.
वेंडिंग मशिनसाठी या विद्यार्थ्यांनी ओपन सीवी, प्रेडिक्शन अल्गोरिदम, पायथोन २.७ यासारख्या सॉफ्टवेअरची मदत घेतली आहे. या मशिनच्या प्रक्रियेत कोठेही मानवी हस्तक्षेप नसल्याने मिळणारे पदार्थ हे १०० टक्के स्वच्छ असतील, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. या मशिनचा वापर फूड मॉल, बीचेस, शाळा किंवा आॅफिस कॅन्टीन येथेही केला जाऊ शकतो. या मशिनद्वारे स्वच्छतेची काळजी घेत तयार होणारे पदार्थ म्हणजे पाणीपुरी, दहीपुरी प्रेमींसाठी ही मशीन पर्वणीच ठरेल, असा विश्वास या विद्यार्थ्यांना आहे.
असा होणार मशिनचा वापर
मशिनच्या वरच्या भागात रगडा, पाणीपुरीसाठी लागणारे विविध प्रकारचे पाणी, दही भरण्यासाठी विशेष व्यवस्था आहे. मशिनच्या खालच्या भागाशी ती विविध पाइपद्वारे जोडण्यात आली आहे. खालच्या भागात पुºया ठेवण्यासाठी तबकडीसारखी एक चकती आहे. चकतीला आवश्यक त्या प्रेशरवर फिरविल्यास आणि वरच्या भागातील हवे त्या पदार्थाचे बटन दाबल्यास पुºया भरण्याची प्रक्रिया सुरू होते. पुºया भरल्यानंतर मशिनमध्ये अलार्म नोटीफिकेशन मिळते.
स्वच्छता राखत जिभेचे चोचले पुरविणे शक्य
विद्यार्थ्यांनी संशोधनाअंती तयार केलेल्या या वेंडिंग मशिनचे वैशिष्ट्य म्हणजे ती कॉइन टाकल्यानंतरच सुरू होते. या मशिनच्या चकतीवर पुºया ठेवल्यानंतर पुऱ्यांमध्ये दही, चिंच, मिरचीचे पाणी इत्यादी हाताने भरण्याची गरज राहत नाही. मशिनद्वारेच ही प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे या मशिनमुळे स्वच्छता राखत जिभेचे चोचले पुरविणे शक्य होणार आहे.