नीट नकोच, अन्यथा वेळ द्या
By Admin | Published: May 5, 2016 06:24 PM2016-05-05T18:24:51+5:302016-05-05T18:24:51+5:30
नीट संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल ६ याचिकांवर आज सुनावणी झाली, ती उद्याही होईल. नीट नकोच, घ्यायचीच असेल तर वेळ द्या, २०१८ ला अंमलबजावणी करा असा युक्तीवाद आज करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयात 'नीट' सुनावणी सुरु, उद्या पुन्हा बाजू ऐकणार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली. दि. ५ : नीट संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल ६ याचिकांवर आज सुनावणी झाली, ती उद्याही होईल. नीट नकोच, घ्यायचीच असेल तर वेळ द्या, २०१८ ला अंमलबजावणी करा असा युक्तीवाद आज करण्यात आला.
महाराष्ट्र, गुजरात राज्यांच्या वकीलानीही बाजू मांडली. राज्याच्या सीईटी बाबत अनेक राज्यांनी कायदे केले आहेत. त्याची दखल घेणार नाही का असा सवाल करीत नीट तातडीने अंमलात आणणे अन्यायकारक आहे, भाषा, अभ्यासक्रम यातील तफावत लक्षात घ्यावी आदी मुद्दे जोरदारपणे मांडण्यात आले. न्या. दवे, न्या. गोयल, न्या. सिंग यांच्या समोर हा युक्तिवाद झाला. नांदेड मधून प्रा. गणेश चौगुले यांनीही खाजगी शिक्षक म्हणून याचिका दाखल केली असून आजच्या सुनावणीस हजर होते.