CAA : मोदींनी आधी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट दाखवावं; अबू आझमींच वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 12:17 PM2020-01-22T12:17:08+5:302020-01-22T12:21:28+5:30

Citizen Amendment Act : आमदार अबू आझमीही राज्यातील विविध भागात होत असलेल्या एनआरसी कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होताना पाहायला मिळत आहे.

Abu Azmi controversial statement on citizen amendment bill | CAA : मोदींनी आधी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट दाखवावं; अबू आझमींच वादग्रस्त वक्तव्य

CAA : मोदींनी आधी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट दाखवावं; अबू आझमींच वादग्रस्त वक्तव्य

Next

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सीएए आणि एनआरसी कायद्यावरुन निशाणा साधला. तर याचवेळी मोदींवर टीका करताना त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. “आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं”, असं अबू आझमी म्हणाले. त्यामुळे यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध केला जात असून महाराष्ट्रात सुद्धा विरोधकांकडून आंदोलने केली जात आहे. त्याचप्रमाणे आमदार अबू आझमीही राज्यातील विविध भागात होत असलेल्या एनआरसी कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी ठाण्यातील मुंब्रा इथं सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी आझमी यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार हल्ला चढवला.

पुढे बोलताना अबू आझमी म्हणाले, “आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं. तुमची आई कुठे जन्मली ते सर्टिफिकेट दाखवा. ज्या खासदारांनी हा कायदा संमत केला, त्यांनी आपल्या आई-वडिलांचं सर्टिफिकेट दाखवावं”, असं वादग्रस्त वक्तव्य यावेळी आझमी यांनी केले.

Web Title: Abu Azmi controversial statement on citizen amendment bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.