अबू आझमीच्या मुलाने वेश्यांसोबत केली अभिनेत्रींची तुलना
By admin | Published: January 6, 2017 02:48 PM2017-01-06T14:48:17+5:302017-01-06T14:55:32+5:30
बंगळुरु विनयभंगाच्या घटनेवर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी समस्त महिला वर्गाचा अपमान केला होता.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - बंगळुरु विनयभंगाच्या घटनेवर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी समस्त महिला वर्गाचा अपमान केला होता. त्यांचा मुलगा फरहान आझमीने वडिलांचा बचाव करताना त्यापुढे एक पाऊल टाकत धक्कादायक विधान केले आहे. फरहानने बॉलिवूड अभिनेत्रींची तुलना थेट शरीरविक्रीय करणा-या महिलांबरोबर केली आहे.
महिलांच्या तोकडे कपडे घालण्यामुळे विनयभंगाच्या घटना वाढत आहेत असे विधान अबू आझमी यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्तासह अनेक महिलांनी निषेध केला होता. फरहानने आपल्या वडिलांचा निषेध करण्याऐवजी उलट इशा गुप्ताला उत्तर दिले आहे.
अबू आझमीला जन्म देणारी महिलाच स्वत:ला दोष देत असेल असे टि्वट इशाने केले होते. त्यावर फरहानने अन्नासाठी शरीर विकणा-या महिलांना आपण वेश्या ठरवून बदनाम करतो त्याचवेळी अंगप्रदर्शन करुन करोडो रुपये कमावणा-यांना सन्मानित करतो असे उत्तर इशाला दिले. महत्वाच म्हणजे फरहानची पत्नी आयशा टाकिया स्वत: एक बॉलिवूड अभिनेत्री आहे.
तन बेचकर दो रोटी जो कमाए उसे हम वेशया नाम देकर ज़लील करते हैं,दूसरी ओर तन की नुमाइश कर करोड़ों कमाने वालों को सम्मानित @eshagupta2811 क्यूँ?
— Farhan Azmi (@abufarhanazmi) 4 January 2017