अवसरीत रोडरोमिओंचा उच्छाद
By admin | Published: September 19, 2016 01:16 AM2016-09-19T01:16:52+5:302016-09-19T01:16:52+5:30
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावात रोडरोमिओंमुळे येथील मुली त्रस्त झाल्या आहेत.
अवसरी : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावात रोडरोमिओंमुळे येथील मुली त्रस्त झाल्या आहेत. मंचर व अवसरी खुर्द कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलींना पायी जात असताना हे रोडरोमिओ मोटारसायकलने कट मारणे, अश्लील भाषेत बोलणे, एसएमएस पाठविणे असे घाणेरडे प्रकार करत आहे.
अवसरी खुर्द एसटी स्टँडखालची वेस, श्री भैरवनाथ विद्यालय परिसरात रोडरोमिओंचा उच्छाद वाढला आहे. विद्यालयाने शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिपायांचा बंदोबस्त ठेवला आहे. या रोडरोमिओंवर कारवाईची मागणी विद्यार्थिनी, पालक तसेच कॉलेज प्रशासनाने केली आहे.
अवसरी खुर्द गावात शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी कॉलेज श्री भैरवनाथ विद्यालय व उच्च माध्यमिक असल्याने या विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी राज्यातून व राज्याबाहेरून मुक्त शिक्षण
घेण्यासाठी अवसरीत आल्या आहेत. त्यापैकी काही मुली शासकीय हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहेत, तर काही मुली अंतर असल्याने समूहाने पायी जात येत असतात.
विद्यालय चालू-बंद होण्याच्या दरम्यान अवसरी खुर्द गावातून स्थानिक व बाहेरगावातील रोडरोमिओ मोटारसायकलवर तीन तीन बसून पायी चाललेल्या मुलींना कट
मारणे, शेजारून जाताना अश्लील भाषेत बोलणे हे प्रकार वारंवार
करत आहेत. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉलेज
परिसरात रोडरोमिओंना चोप दिला होता. मात्र, यानंतरही पुन्हा रोडरोमिओंचा वावर वाढला
आहे. त्याच्याप्रमाणे अवसरी खुर्द गावच्या पश्चिमेला श्री भैरवनाथ विद्यालय व उच्च माध्यमिक महाविद्यालय आहे.
हे विद्यालय चालू-बंद ू
होण्याच्या वेळेत रोडरोमिओ मोटारसायकलवरून हेलपाटे मारत असतात. विद्यालयाच्या वतीने मुख्य प्रवेशद्वारी एक शिपाई संरक्षणासाठी ठेवला आहे. (वार्ताहर)
>पुढाऱ्यांचा दबाव : कारवाईची मागणी
मंचर पोलीस एसएमएस पाठविणाऱ्या टुकार रोडरोमिओंना राजकीय पुढारी पाठीशी घालत आहेत. पोलिसांत कारवाई करू नये म्हणून पुढारी दबाब आणतात. मंचर पोलिसांनी दबाब आणणाऱ्या पुढाऱ्यांना बळी पडू नये व रोडरोमिओंचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक करत आहेत.