बीएसयूपीच्या घरांचा दुरुपयोग
By Admin | Published: March 3, 2017 03:22 AM2017-03-03T03:22:42+5:302017-03-03T03:22:42+5:30
रेंटल हाउसिंगची घरे दुसऱ्यांनाच राहण्यासाठी देण्याचे प्रकरण महापालिकेत गाजले असताना आता बीएसयूपीच्या घरांचा घोळही पुढे आला आहे.
ठाणे : रेंटल हाउसिंगची घरे दुसऱ्यांनाच राहण्यासाठी देण्याचे प्रकरण महापालिकेत गाजले असताना आता बीएसयूपीच्या घरांचा घोळही पुढे आला आहे. बीएसयूपीमध्ये मिळालेली घरे परस्पर भाड्याने देणाऱ्या अथवा विविध कागदपत्रांची बनावटगिरी करून ती विकणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, तब्बल ५५ जणांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे.
दीड वर्षापूर्वी रेंटलची घरे मिळाल्यावर ती इतरांना भाड्याने देण्याचे प्रकरणसमोर आल्यानंतर पालिकेने याविरोधात गुन्हे दाखल करताना अशी घरे ताब्यात घेतली होती. आता पुन्हा बीएसयूपीच्या घरांचेदेखील प्रकरण अशा पद्धतीनेसमोर आल्याने पालिकेने आता याविरोधात पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नव्याने रस्ता रु ंदीकरणाची मोहीम हाती घेतल्यानंतर अनेक रहिवाशांचे तत्काळ रेंटल अथवा बीएसयूपीच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले. शास्त्रीनगर येथील विस्थापित झालेली ३५८ घरे बाधित झाल्याने त्यांना तुळशीधाम येथील बीएसयूपीच्या घरांमध्ये स्थान देण्यात आले. राहते घरे तोडण्यात आल्याने पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने ही तातडीची कारवाई केली होती. परंतु,या तातडीच्या उपाययोजनेच्या आर्थिक लाभासाठी फायदा करून घेत काही विस्थापितांनी आपल्या घरांचे रूपांतर दुकानात केले आहे. तब्बल ५५ जणांनी आपली बीएसयूपीची घरे भाड्याने दिली आहेत. तर, पर्यायी घरे मिळाल्यानंतरही ७० जण या घरांमध्ये राहण्यासाठीच गेलेले नाहीत.
शहरातील अनेक विस्थापितांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. अशावेळी मिळालेल्या घरांचाही दुरुपयोग होत असल्याने अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आक्र मक झाले आहेत. त्यांनी आपली घरे परस्पर भाड्याने देणाऱ्यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याची शिफारस आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे. एवढेच नव्हे तर ज्यांची घरे ताबा दिल्यानंतरही महिनोन्महिने बंद आहेत, अशा घरांचा पंचनामा करून ती पुन्हा ताब्यात घेण्याचा उपाय सुचवला आहे. व्हिडीओ चित्रीकरण करून ही बंद असलेली घरे ताब्यात घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
>विस्थापितांच्या नावाखाली इतरांनी लाटली घरे
महापालिकेच्या विशेष पथकाने बीएसयूपीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची तपासणी केली होती. या तपासणीमध्ये विस्थापितांच्या नावाखाली इतर नागरिकांनीच घरे लाटल्याचे समोर आले होते. अशाप्रकारे महापालिकेची फसवणूक झाल्याने या रहिवाशांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची फाइल अतिरिक्त आयुक्तांच्या दालनातून आयुक्तांच्या दालनात पोहोचली असून आयुक्तांचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर गुन्हे दाखल होण्याची प्रक्रि या सुरू होणार आहे.
दीड वर्षापूर्वी रेंटलची घरे मिळाल्यावर ती इतरांना भाड्याने देण्याचे प्रकरणसमोर आल्यानंतर पालिकेने याविरोधात गुन्हे दाखल करताना अशी घरे ताब्यात घेतली होती.