देशात कलह माजविण्यासाठी सत्तेचा गैरवापर; परिवर्तन हवे : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 06:48 AM2024-02-25T06:48:55+5:302024-02-25T06:49:07+5:30
तुतारी चिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड/अलिबाग : देशामध्ये गंभीर स्थिती आहे, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. सत्ता ही सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी वापरण्याऐवजी राज्याराज्यात, भाषांमध्ये या सर्वांत कलह माजवण्यासाठी होत आहे. यामुळे देशात आता परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दांत खा. शरद पवार यांनी सत्तेतील भाजपवर निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला निवडणूक आयोगाने नुकतेच तुतारी हे नवे चिन्ह दिले आहे. त्याचे अनावरण किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ केले. त्यावेळी पवार बोलत होते.
ही तर एका संघर्षाची सुरुवात : पवार
ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. जनतेसमोर आनंदाच्या तुतारीचे रणशिंग फुंकण्याची स्थिती तुमच्या कष्टाने, प्रयत्नाने येईल याची खात्री आहे, असा विश्वासही शरद पवार यांनी बोलून दाखविला.
शरद पवार ४० वर्षांनी किल्ले रायगडावर आले. त्यावरून विरोधकांनी टीकाही केली.