रत्नागिरीत अभाविपने काढली १,१११ फूट तिरंगा रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 03:43 PM2019-12-07T15:43:22+5:302019-12-07T15:53:31+5:30
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून १,१११ फूट विक्रमी तिरंगा रॅलीचे आज, शनिवारी सकाळी रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे कोकणात प्रथमच अशा प्रकारे रॅली काढण्यात आली. यामुळे कोकणात अभाविपकडून नवा इतिहास रचला गेला.
रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून १,१११ फूट विक्रमी तिरंगा रॅलीचे आज, शनिवारी सकाळी रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे कोकणात प्रथमच अशा प्रकारे रॅली काढण्यात आली. यामुळे कोकणात अभाविपकडून नवा इतिहास रचला गेला.
हैद्राबाद येथील बलात्काराचा निषेध तसेच याविरुद्ध कायदा करण्यात यावा, या भावनेसाठी आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या झंझावाती शौर्यगाथेच स्मरण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी शहरातील विविध क्षेत्रातील १० कर्तृत्ववान महिलांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला.
शनिवारी सकाळी ८ वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयापासून रॅलीला प्रारंभ करण्यात आला आणि लक्ष्मी चौक मैदानात रॅलीचा समारोप झाला. या रॅलीसाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अभविपकडून करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांचीही मोठी गर्दी दिसत होती.