अभाविप-एसएफआय वाद कायम
By Admin | Published: February 28, 2017 04:41 AM2017-02-28T04:41:33+5:302017-02-28T04:41:33+5:30
स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया या दोन संघटनांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे पडसात सोमवारीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उमटले.
पुणे : आक्षेपार्ह पोस्टर लावल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया या दोन संघटनांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे पडसात सोमवारीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उमटले. एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे विद्यापीठात रॅली काढण्यास परवानगी मागितली. मात्र, पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या आवारात अभाविप आणि एसएफआय या दोन संघटनांमध्ये वाद सुरू आहेत. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विद्यापीठाच्या आवारात दडपशाही केली जात असल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढण्याची भूमिका घेतली. परंतु, पोलिसांनी त्यास परवानगी न दिल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ वाद झाला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. (प्रतिनिधी)