गणेशोत्सवात कोकणात एसी डबल डेकर ‘हॉलिडे स्पेशल’

By admin | Published: August 12, 2014 02:54 AM2014-08-12T02:54:04+5:302014-08-12T02:54:04+5:30

गणेशोत्सवात कोकणवासीयांचा यंदाचा प्रवास गारेगार होणार आहे. नवीन एसी डबल डेकर ट्रेनला ‘हॉलिडे स्पेशल’ ट्रेन म्हणून चालवण्यास रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली आहे

AC Double Decker 'Holiday Special' in Konkan in Ganeshotsav | गणेशोत्सवात कोकणात एसी डबल डेकर ‘हॉलिडे स्पेशल’

गणेशोत्सवात कोकणात एसी डबल डेकर ‘हॉलिडे स्पेशल’

Next

मुंबई : गणेशोत्सवात कोकणवासीयांचा यंदाचा प्रवास गारेगार होणार आहे. नवीन एसी डबल डेकर ट्रेनला ‘हॉलिडे स्पेशल’ ट्रेन म्हणून चालवण्यास रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली आहे. ही ट्रेन गणेशोत्सवातच चालवण्यासाठी आता मध्य रेल्वेकडून जोरदार तयारी केली जात आहे.
दहा डब्यांची आणि प्रत्येक डब्यात १२0 प्रवासी क्षमता असलेली एसी डबल डेकर ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे. ही ट्रेन एलटीटी ते मडगाव अशी धावणार आहे. या ट्रेनच्या रेल्वेच्या आरडीएसओकडून चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यानंतर ट्रेन धावण्यास कुठलीही अडचण नसल्याचा अहवाल कोकण आणि मध्य रेल्वेला दिला होता. त्यानंतर हा अहवाल मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. मात्र अहवाल सादर केल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी काही माहिती कोकण आणि मध्य रेल्वेकडे मागितली होती. ही माहिती दिल्यानंतर आयुक्त, कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे अधिकाऱ्यांची सीएसटी मुख्यालयात सोमवारी बैठक झाली. यात रेल्वेकडून एसी डबल डेकर ट्रेनला हॉलिडे स्पेशल ट्रेन म्हणून चालवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार आयुक्त चेतन बक्षी यांनी त्याला मंजुरी दिली. याबाबत चेतन बक्षी यांनी सांगितले की, मध्य रेल्वेकडून हा प्रस्ताव माझ्याकडे आला होता. त्याला हॉलिडे स्पेशल म्हणून मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवात ही ट्रेन चालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुठलीही अडचण नसल्यामुळे ती धावेलही. फक्त या ट्रेनचे वेळापत्रक कसे असेल याची माहिती मागितली असून, तीदेखील मला मिळेल. एक अतिरिक्त शताब्दी विशेष ट्रेन कोकण आणि मध्य रेल्वेकडून चालवण्यात येत असून, तिच्या वेळेनुसार एसी डबल डेकर ट्रेन चालवण्यात येणार आहे. विशेष शताब्दी ट्रेनची वेळ ही सकाळी ५ वाजताची असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)

Web Title: AC Double Decker 'Holiday Special' in Konkan in Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.