मडगाव-रत्नागिरीदरम्यान एसी डबल डेकर धावणार

By admin | Published: May 20, 2014 03:51 AM2014-05-20T03:51:03+5:302014-05-20T03:51:03+5:30

डबल डेकर एसी एक्स्प्रेसची मागील शनिवारी पहिली चाचणी पार पडल्यानंतर या एक्स्प्रेसची आणखी दोन दिवस चाचणी कोकण रेल्वेमार्गावर होणार आहे

The AC Double Decker will be run during Madgaon-Ratnagiri | मडगाव-रत्नागिरीदरम्यान एसी डबल डेकर धावणार

मडगाव-रत्नागिरीदरम्यान एसी डबल डेकर धावणार

Next

मुंबई : डबल डेकर एसी एक्स्प्रेसची मागील शनिवारी पहिली चाचणी पार पडल्यानंतर या एक्स्प्रेसची आणखी दोन दिवस चाचणी कोकण रेल्वेमार्गावर होणार आहे. त्यानुसार मंगळवारी मडगाव-रत्नागिरी मार्गावर या एक्स्प्रेसची चाचणी होईल. कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांना गारेगाव प्रवासाचा आनंद देण्यासाठी या मार्गावर डबल डेकर एसी एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या एक्स्प्रेसची आरडीएसओकडून चाचणी घेण्यात येत आहे. ही ट्रेन मुंबई ते मडगाव अशी असणार आहे. पहिली चाचणी शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच ती ट्रेन मडगावपर्यंत धावणार आहे. या चाचण्या पार पडल्यानंतर मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अंतिम अहवालानंतर रेल्वे मंत्रालय याबाबत निर्णय घेणार आहे. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यावर रेल्वे चालवली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The AC Double Decker will be run during Madgaon-Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.