मुंबईत १५ मे पासून धावणार एसी लोकल
By admin | Published: April 21, 2016 04:52 PM2016-04-21T16:52:22+5:302016-04-21T17:32:29+5:30
उन्हाच्या वाढत्या पा-यामुळे घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांचा लोकल प्रवास लवकरच गारेगार होणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - उन्हाच्या वाढत्या पा-यामुळे घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांचा लोकल प्रवास लवकरच गारेगार होणार आहे. मुंबईत येत्या १५ मे पासून एसी लोकल धावणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. एसी लोकलचे भाडे अद्याप निश्चित झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मुंबईत लवकरच लोकल, मेट्रो आणि बस प्रवासासाठी एकच तिकीट सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईची ओळख असलेले सीएसटी रेल्वे स्टेशन नव्याने बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसी लोकलची बांधणी रेल्वेच्या चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) करण्यात आली आहे. तब्बल ५५ कोटी रुपये किंमत असलेली ही लोकल सध्या मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये आहे.
एसी लोकलचे दरवाजे बंद झाल्याशिवाय लोकल सुरू होऊ शकणार नाही आणि एखादा प्रवासी दरवाजाजवळील फुटबोर्डाकडे उभा राहिल्यास दरवाजा बंद होऊ शकणार नाही. मुंबईत लोकलमध्ये तुडूंब गर्दी असते. त्यामुळे दरवाजाजवळ लटकून अनेकजण प्रवास करतात. एसी लोकल चालवताना त्यातील गर्दीला आवर घालण्याचे रेल्वे प्रशासनासमोर मुख्य आव्हान असेल.