एसी लोकलची चाचणी सुरू
By admin | Published: May 29, 2017 04:44 AM2017-05-29T04:44:05+5:302017-05-29T04:44:23+5:30
बहुचर्चित आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या वातानुकूलित लोकलच्या चाचणीला अखेर सुरुवात झाली. शुक्रवारी रात्री
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बहुचर्चित आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या वातानुकूलित लोकलच्या चाचणीला अखेर सुरुवात झाली. शुक्रवारी रात्री १२ वाजता मुंबई सेंट्रल ते बोरीवली आणि बोरीवली ते विरार या मार्गांवर ही चाचणी घेण्यात
आली.
मध्य रेल्वे मार्गानंतर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथे एसी लोकल चाचणीसाठी सज्ज होती. पहिल्या दिवशी चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली असली, तरी रात्री उशिरा ही चाचणी का उरकण्यात आली, याचे कारण गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, चाचणीला सुरुवात झाल्याच्या वृत्ताला पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दुजोरा दिला आहे.
चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीतून गेल्या वर्षी ५ एप्रिल रोजी ही एसी लोकल मुंबईत दाखल झाली
होती. त्यानंतर, बुधवारी ही वातानुकूलित लोकल चाचणीसाठी मुंबई कारशेडमध्ये आणण्यात
आली आहे.
८० दिवस चाचणी सुरू राहणार : शुक्रवारी एसी लोकलची चाचणी यशस्वी झाली आहे. ८० दिवस ही चाचणी सुरू राहील. चाचणीअंती लवकरच प्रवासी सेवेत एसी लोकल दाखल करण्यात येईल.
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे