नागपूरमार्गे पुण्यासाठी एसी सुपरफास्ट रेल्वेगाड्या
By admin | Published: August 11, 2016 07:34 PM2016-08-11T19:34:25+5:302016-08-11T19:34:25+5:30
प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि प्रतीक्षायादी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूरमार्गे रेल्वेगाडी क्रमांक ०२८२१/०२८२२ पुणे-संत्रागाछी-पुणे १६ साप्ताहिक एसी सुपरफास्ट रेल्वेगाड्या
Next
>प्रवाशांसाठी सुविधा : प्रतीक्षायादी वाढल्याने घेतला निर्णय
नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि प्रतीक्षायादी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूरमार्गे रेल्वेगाडी क्रमांक ०२८२१/०२८२२ पुणे-संत्रागाछी-पुणे १६ साप्ताहिक एसी सुपरफास्ट रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२८२१ पुणे-संत्रागाछी ही विशेष एसी सुपरफास्ट रेल्वेगाडी प्रत्येक सोमवारी १७, २४, ३१ आॅक्टोबर आणि ७, १४, २१, २८ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता सुटून संत्रागाछीला दुसºया दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता पोहोचेल. ही गाडी दुसºया दिवशी मंगळवारी ११, १८, २५ आॅक्टोबरला आणि १, ८, १५, २२ आणि २९ नोव्हेंबरला नागपूरला रात्री १.२० वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२८२२ संत्रागाछी-पुणे एसी सुपरफास्ट ही गाडी संत्रागाछीवरून प्रत्येक शनिवारी ८, १५, २२, २९ आॅक्टोबर आणि ५, १२, १९ आणि २६ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता सुटून पुण्याला तिसºया दिवशी रात्री २.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी प्रत्येक रविवारी ९, १६, २३, ३० आॅक्टोबर आणि ६, १३, २० आणि २७ नोव्हेंबरला नागपूरला सकाळी ११.१५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना पनवेल, भुसावळ, नागपूर, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात ३ एसी टु टायर, ८ एसी थ्री टायर कोच आहेत. या गाड्यांचे आरक्षण ११ आॅगस्टपासून सुरू होणार आहे.