शिक्षण संवादमधून घडणार शैक्षणिक मंथन
By admin | Published: February 19, 2016 05:19 PM2016-02-19T17:19:08+5:302016-02-19T17:19:08+5:30
एक व्यापक विचारमंथन घडवून आणण्यासाठी लोकमत माध्यम समुहाच्या वतीने शिक्षण संवाद हा विशेष कार्यक्रम 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेला आहे
Next
>शिक्षणविश्वाचा विनोद तावडे यांच्याशी मुक्त संवाद
पुणे, दि. 19 - महाराष्ट्रातील शैक्षणिक विकासामध्ये सातत्याने भेडसावणा:या विविध प्रश्नांचा वेध घेताना शिक्षणक्षेत्रतील सद्य:स्थिती व भविष्यातील वाटचाल यावर एक व्यापक विचारमंथन घडवून आणण्यासाठी लोकमत माध्यम समुहाच्या वतीने शिक्षण संवाद हा विशेष कार्यक्रम 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेला आहे. शिक्षणजगतातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण संस्थापकांना एकत्र आणून राज्याचे शालेय, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
हा कार्यक्रम कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टइनमध्ये सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी निमंत्रितांनाच प्रवेश आहे.
राज्यातील शालेय व उच्च शिक्षणाशी संबंधित अनेक विषय या निमित्ताने चर्चेला येणार आहेत. विविध विषयांवर थेट प्रश्नोत्तरे होणार असून त्यातून शिक्षणातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर साधकबाधक चर्चा व व्यापक मंथन होणार आहे.
नव्या पिढीच्या उज्जवल भविष्याची चाहूल जाणून शिक्षण क्षेत्रतील सुसंवादाची गरज लक्षात घेत लोकमत माध्यम समुहाने त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रमध्ये ज्यांनी ख:या अर्थाने योगदान दिलेले आहे अशा धुरीणांना थेट शासनाशी संवाद साधण्याची संधी यानिमित्ताने प्राप्त होणार आहे.