‘शिक्षण संवाद’मधून घडणार शैक्षणिक मंथन

By admin | Published: February 20, 2016 02:47 AM2016-02-20T02:47:48+5:302016-02-20T02:47:48+5:30

महाराष्ट्रातील शैक्षणिक विकासामध्ये सातत्याने भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांचा वेध घेताना शिक्षणक्षेत्रातील सद्य:स्थिती व भविष्यातील वाटचाल यावर एक व्यापक विचारमंथन घडवून आणण्यासाठी

Academic churning will happen in 'Education Dialogue' | ‘शिक्षण संवाद’मधून घडणार शैक्षणिक मंथन

‘शिक्षण संवाद’मधून घडणार शैक्षणिक मंथन

Next

पुणे : महाराष्ट्रातील शैक्षणिक विकासामध्ये सातत्याने भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांचा वेध घेताना शिक्षणक्षेत्रातील सद्य:स्थिती व भविष्यातील वाटचाल यावर एक व्यापक विचारमंथन घडवून आणण्यासाठी लोकमत माध्यम समूहाच्या वतीने ‘शिक्षण संवाद’ हा विशेष कार्यक्रम २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पुण्यातील हॉटेल वेस्टइनमध्ये आयोजिलेला आहे. शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण संस्थापकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून राज्याचे शालेय, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी निमंत्रितांनाच प्रवेश आहे. राज्यातील शालेय व उच्च शिक्षणाशी संबंधित अनेक विषय यानिमित्ताने चर्चेला येणार आहेत.
विविध विषयांवर थेट प्रश्नोत्तरे होणार असून त्यातून शिक्षणातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर साधकबाधक चर्चा व व्यापक मंथन होणार आहे.
नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याची चाहूल जाणून शिक्षणक्षेत्रातील सुसंवादाची गरज लक्षात घेत लोकमत माध्यम समूहाने त्यासाठी पुढाकार
घेतलेला आहे.

Web Title: Academic churning will happen in 'Education Dialogue'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.