एसीबीचे ३९५ सापळे यशस्वी
By admin | Published: June 27, 2017 01:53 AM2017-06-27T01:53:09+5:302017-06-27T01:53:09+5:30
राज्यभरात एसीबीने गत सहा महिन्यांत ३९५ सापळे यशस्वी करून अनेक लाचखोरांना जेरबंद केले आहे. लाचखोरीत नेहमीप्रमाणे महसूल विभाग
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यभरात एसीबीने गत सहा महिन्यांत ३९५ सापळे यशस्वी करून अनेक लाचखोरांना जेरबंद केले आहे. लाचखोरीत नेहमीप्रमाणे महसूल विभाग पहिल्या, तर पोलीस विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ते २२ जून २०१७ दरम्यान राज्यातील एकूण आठ विभागांत ३९५ यशस्वी सापळे रचण्यात आले. याशिवाय अपसंपदाचे ६ आणि भ्रष्टाचाराच्या १४ प्रकरणांमध्येही ट्रॅप रचण्यात आले. मुंबई विभागात १३, ठाणे ५०, पुणे ९४, नाशिक ५९, नागपूर ४७, अमरावती ३६, औरंगाबाद ५३, तर नांदेड विभागात ४३ असे सापळे यशस्वी करण्यात आले आहेत.