एसीबीच्या व्हॉट्सअॅपवर नागरी तक्रारी!
By Admin | Published: August 26, 2016 12:49 AM2016-08-26T00:49:47+5:302016-08-26T00:49:47+5:30
शासकीय कामांसाठी लाच द्यावी लागू नये तसेच लाचखोरांविरुद्धच्या तक्रारींसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केला
विकासाला गती : चंद्रपूर मनपा, ८ नगरपालिका ,५ नगरपंचायतींना २८ कोटींचा निधी
मंगेश भांडेकर चंद्रपूर
लोकसंख्या व क्षेत्रफळ या निकषाच्या आधारे ‘ड’ वर्ग असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना राज्य शासनाने चौदाव्या वित्त आयोगाचा निधी मंजूर केला आहे. यात चंद्रपूर मनपासह जिल्ह्यातील ८ नगरपालिका व ५ नगरपंचायतींचा समावेश असून १४ व्या वित्त आयोग अंतर्गत तब्बल २८ कोटी ९६ लाख ६६ हजार रूपयाचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहर विकासाची कामे करण्यास सुलभ जाणार असून नागभीड नगरपालिका व सिंदेवाही नगरपंचायतीला मात्र यातून वगळण्यात आले आहे.
जिल्ह्यात गोंडपिंपरी, कोरपना, सावली, पोंभुर्णा, जिवती या पाच नगरपंचायतीची स्थापना गतवर्षी झाली. चिमूर, गडचांदूर या नगरपालिकाही नव्यानेच स्थापन झाल्या. तर नगरपालिकेच्या मागणीसाठी नगरपंचायतीला नागरिकांचा विरोध सुरू असताना नागभीड नगरपालिका व सिंदेवाही नगरपंचायीला शासनाने मंजूरी दिली. सध्यास्थितीत नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतींचा कारभार नवीन आहे. शहरात विकासात्मक योजना राबविण्यासाठी निधी नाही. त्यामुळे या पालिकांनी शासनाकडे निधीची मागणी केली होती.
चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना वितरीत करण्यासाठी २०१६-१७ च्या मुलभूत अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी निधी केंद्र शासनाने मुक्त केले होते. सदर निधी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना वितरीत करण्याची बाब राज्य शासनाच्या विचारधीन होती. याबाबत राज्य शासनाने २४ आॅगस्टला परिपत्रक काढले असून निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे.
सदर निधी खर्च करताना शासन निर्गमीत करेल अशा शासन निर्णयातील तरतुदीनुसार तसेच वेळोवेळी दिलेल्या सुचनांनुसार खर्च करण्याचे बंधनकारक राहणार आहे. एकुणच या निधीमुळे मनपा, नगरपालिका, नगरपंचायतींना मोठा आर्थिक आधार मिळाला असून शहर विकासाची अनेक कामे करता येणार आहेत. यातीन पालिकांची आर्थिक अडचण काहीसी दूर होणार आहे.