एफटीआयमध्ये प्रतिज्ञापत्राची सक्ती

By admin | Published: July 23, 2016 01:37 AM2016-07-23T01:37:36+5:302016-07-23T01:37:36+5:30

एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचा विडाच जणू नवीन संचालकांनी उचलला आहे.

Acceptance of affidavit in FTI | एफटीआयमध्ये प्रतिज्ञापत्राची सक्ती

एफटीआयमध्ये प्रतिज्ञापत्राची सक्ती

Next


पुणे : एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचा विडाच जणू नवीन संचालकांनी उचलला आहे. बेशिस्त वागणुकीवर निर्बंध घालण्याकरिता संस्थेमध्ये शिस्त लावणाऱ्या अधिकाऱ्याची (प्रॉक्टर) नेमणूक करण्याचे सूतोवाच केल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी शिस्तीचे काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भातील एक नियमावलीच तयार केली आहे. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाणार आहे.
सरकारविरोधात बंड पुकारून चार महिने संस्थेला वेठीस धरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त आणि धाकात ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने या स्वरूपाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सिनिअर विद्यार्थ्यांच्या नादी लागून नवीन विद्यार्थी त्यांच्या पावलावर पाऊल टाकू नये म्हणून प्रवेश घेण्याआधीच त्यांच्याकडून नियम पाळण्यासंदर्भातील हे प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाणार आहे.
नियम पाळणे विद्यार्थ्यांवर बंधनकारकच आहे. त्यासाठी कुठल्याच शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात नाही. अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्यामागे नवीन विद्यार्थ्यांकडून आंदोलनाचे शस्त्र भविष्यात उचलले जाऊ नये, म्हणून ही सावधगिरी बाळगली असल्याची चर्चा आहे.
हे आहेत नियम
एखाद्या नियमाचा भंग झाल्यास दंड भरण्यास मी बांधिल असेन, संस्थेच्या परिसरात शांतताभंग झाल्यास मी कारवाईस पात्र असेन, सभ्यता राखेन आणि प्राध्यापक, कर्मचारी आणि वरिष्ठ मंडळींना अपमानास्पद वागणूक न देणे. संस्थेमध्ये सुरक्षित वातावरण ठेवण्यासाठी केलेल्या नियमांचा आदर केला जाईल आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना सहकार्य करून त्यांच्याशी विनम्रतेने वागेन. प्रवेश घेण्यापूर्वीच संपूर्ण शुल्क भरले जाईल, याबाबत कोणताही मानसिक दबाव टाकला जाणार नाही, अशा नियमांचा समावेश आहे.
>२००४ मध्ये विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र भरू न घेण्यात आले होते. त्यात नवीन काहीच नाही. इतर शैक्षणिक संस्थांमध्येही अशा प्रकारची नियमावली आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेमधील शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे, हाच त्यामागचा उद्देश आहे.
- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय

Web Title: Acceptance of affidavit in FTI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.