स्वमग्न जगण्याचा स्वीकार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2017 01:35 AM2017-04-02T01:35:08+5:302017-04-02T01:35:08+5:30
भारतात ६६ मुलांपैकी १ मूल स्वमग्न आहे, जगभरात हेच प्रमाण ६८ पैकी १ असे असल्याची संयुक्त राष्ट्रसंघाची आकडेवारी सांगते. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात १९ वर्षाखालील ७८
मेघना ढोके, नाशिक
भारतात ६६ मुलांपैकी १ मूल स्वमग्न आहे, जगभरात हेच प्रमाण ६८ पैकी १ असे असल्याची संयुक्त राष्ट्रसंघाची आकडेवारी सांगते. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात १९ वर्षाखालील ७८ लाखांहून अधिक मुले दिव्यांग आहेत. मात्र या आकडेवारीच्या पलिकडे जावून विचार केला तर आजही स्वमग्नता असणाऱ्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे प्रश्न, समाजासह कुटुंबाने करण्याचा स्वीकार हे प्रश्न गंभीर आहेत.
स्वमग्नता जागरुकता दिनानिमित्त यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनेही काम करण्यात येत आहे. ‘टूवर्ड अॅटॉनॉमी अॅण्ड सेल्फ डिर्टर्मिनेशन!’ अशी ही संकल्पना आहे. स्वमग्नता असणाऱ्या मुलांना पूर्ण स्वायत्तता, स्वयंनिर्णयता आणि स्वयंपूर्णता देण्यासाठी पालकांसह शिक्षक आणि समाजाने एकत्रित काम करावे, हे या संकल्पनेत अभिप्रेत आहेच. मात्र हे सारे तेव्हाच होईल जेव्हा स्वमग्न मूलांचा पूर्ण स्वीकार पालकांनीही केला तर!
विशेषत: भारतासारख्या देशात स्वमग्नता असणाऱ्या मुलांचा पूर्ण स्वीकार आणि त्यांचे पालनपोषण यासंदर्भातील अज्ञान, गैरसमजूती यासंदर्भातील प्रश्न आजही बिकट आहेत. ग्रामीण भागात माहितीचा अभाव आहे. त्यातून पालक मुलाच्या योग्य निदानापर्यंत आणि उपचारासह प्रशिक्षणापर्यंत पोहोचत नाहीत. शहरी भागात आता एक नवीन प्रश्न दिसतो आहे. अनेक पालक गुगलसह इंटरनेटवर माहिती शोधून त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे स्वत:च उपचार तरी करू पाहतात किंवा योग्य निदानापर्यंत पोहोचत नाही. दोन्हीही संदर्भात मुलांचा स्वीकार, उपचार आणि स्वयंपूर्णता यासंदर्भात वेळीच काम सुरु होत नाही. आपल्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध नाही पण आयुष्य जगायला आपण त्याला स्वयंनिर्भर करू शकतो यादिशेने विचार होत नाही, हे आजही आपल्या समाजातील वास्तव आहे.