बाळू धानोरकरांच्या मृत्यूमागे घातपात; आईचा सनसनाटी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 11:07 AM2024-11-09T11:07:00+5:302024-11-09T11:10:38+5:30

Maharashtra Assembly Election 2024: चंद्रपूरचे माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या आई वत्सला धानोरकर यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलाचे म्हणजे बाळू धानोरकर यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांच्या मृत्यूमागे घातपात आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी शुक्रवारी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केला.

Accident behind Balu Dhanorkar's death; Mother's sensational allegation | बाळू धानोरकरांच्या मृत्यूमागे घातपात; आईचा सनसनाटी आरोप

बाळू धानोरकरांच्या मृत्यूमागे घातपात; आईचा सनसनाटी आरोप

चंद्रपूर - चंद्रपूरचे माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या आई वत्सला धानोरकर यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलाचे म्हणजे बाळू धानोरकर यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांच्या मृत्यूमागे घातपात आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी शुक्रवारी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केला. मात्र कुणाचे नाव घेतले नाही. संशयास्पद मृत्यूच्या चौकशीची मागणी करत विषप्रयोगाचा संशय व्यक्त केला.

बाळू यांचे सख्खे मोठे बंधू अनिल धानोरकर वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. आई मोठ्या मुलाचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे एकीकडे खासदार सून प्रतिभा धानोरकर आणि दुसरीकडे सासू, असा संघर्ष येथे दिसू लागलाय. आता प्रवीण काकडे दिवंगत बाळू धानोरकर यांचा वारसा सांगत मते मागत आहेत. त्यामुळे वरोरामध्ये निवडणूक चुरशीची झाली. ३० मे २०२३ रोजी खासदार धानोरकर यांचे निधन झाले होते.

Web Title: Accident behind Balu Dhanorkar's death; Mother's sensational allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.