पाणी ङिारपल्यामुळे दुर्घटना

By admin | Published: August 6, 2014 11:14 PM2014-08-06T23:14:35+5:302014-08-06T23:14:35+5:30

माळीण गावातील घडलेल्या दुर्घटनेची शास्त्रीय कारणो शोधण्यासाठी केंद्रीय भवन अनुसंधान संस्थान रुरकी उत्तराखंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पूर्ण डोंगर पायी फिरून पाहिला.

Accident due to water accidents | पाणी ङिारपल्यामुळे दुर्घटना

पाणी ङिारपल्यामुळे दुर्घटना

Next
>घोडेगाव : माळीण गावातील घडलेल्या दुर्घटनेची शास्त्रीय कारणो शोधण्यासाठी केंद्रीय भवन अनुसंधान संस्थान रुरकी उत्तराखंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पूर्ण डोंगर पायी फिरून पाहिला. डोंगराला वरच्या बाजूला पडलेल्या भेगांमध्ये पावसाने पाणी ङिारपल्यामुळे व डोंगरामध्ये असलेल्या दगडाचा उतार खालच्या बाजूला असल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. 
‘सीएसआयआर’ या संस्थेचे निर्देशक एस. के. भट्टाचार्य यांच्या सूचनेनुसार डॉ. शंतनू सरकार व डॉ. देवीप्रसन्न कान्नुगो या दोन भू-वैज्ञानिकांनी माळीणमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली. कोसळलेल्या डोंगराचा भाग त्यांनी पायी फिरून काही निष्कर्ष काढले.  
माळीण  दुर्घटना घडण्याची दोन कारणो दिसून येतात, असे त्यांनी सांगितले. यामध्ये जेथून डोंगर खचली त्याच्या एका बाजूने पाणी वाहत आहे. तसेच मधूनही  एक पाण्याची धार वाहत आहे.  ही मधली धार डोंगराला असलेल्या मातीच्या आतून येताना दिसते व खाली पूर्ण काळा दगड आहे. या पाण्याने माती व दगड यामध्ये भेग पाडली. या छोटय़ा-मोठया भेगा डोंगरामध्ये अनेक ठिकाणी दिसत आहेत. या भेगांमध्ये पाणी जाऊन हा डोंगराचा भाग खचला असावा.  दुसरे कारण म्हणजे डोंगराचा भाग कोसळून आतला मोकळा झालेला दगड पाहिला असता, दगडाचा उतार गावाकडे आहे. काही डोंगरांमध्ये आतला दगडाचा उतार विरूद्ध दिशेला असतो अथवा वेडावाकडा असतो. त्यामुळे माती खचत नाही. मात्र, येथे दगडाचा उतार खाली असल्यामुळे पाण्याच्या दबामुळे दगडावरून माती सरकली व ही माती खाली कोसळत गेली. खाली जाताना मातीने खालचा भाग खेचून नेला. त्यामुळे एवढा मोठा मलबा खाली गावावर पडला. 
 पावसाळयामध्ये या दुर्घटना जास्त घडतात. उत्तराखंडमध्येही पावसाळयात जमीन खचण्याच्या, डोंगर ढसळण्याच्या घटना घडत असतात. अनेक डोंगरांवर आपण छोटय़ा-मोठया प्रमाणात जमीन खचल्याचे पाहतो. येथे हा खचलेला डोंगर गावावर आल्यामुळे मोठी दुर्घटना घडली व या भूगर्भातील घडमोडींकडे सर्व जण लक्ष देऊ लागले आहेत. (वार्ताहर)
 
4या ठिकाणी मोठय़ा मशिनरी वापरून शेतजमीन तयार केली असेल, तर या मशिनरींच्या हद:यांमुळे या भेगा वाढल्या असतील. मात्र, येथील शेती पाहिली असता छोटे-छोटे टप्पे दिसत आहेत, यासाठी खूप मोठय़ा मशिन वारल्या गेल्या असतील, असे वाटत नाही. 
 
4ही प्रक्रिया अनेक वर्षापासून घडत आली असावी. येथे जमिनीला गेलेल्या भेगा सरपंच अथवा ग्रामस्थ यांनी लक्षात आणून दिल्या असत्या तर या भेगा बुजवून ही दुर्घटना वाचवता आली असती.
 
प्रशासकीय पातळीवरील काम ब:याच अंशी उरकले होते. त्यामुळे ते काहीसे निश्चिंत असतानाच अद्याप 6 जणांचे मृतदेह मिळाले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली. या वेळी मृतदेह मिळेर्पयत काम सुरू ठेवण्याचे आश्वासन राव यांनी दिले. काही नातेवाईक जेसीबी, पोकलेन यंत्रत बसून त्यांच्या स्वकीयांचा शोध घेतला. त्यानंतर एक मृतदेह सापडला. मात्र सायंकाळी ग्रामस्थांशी चर्चा करून अखेर काम थांबविण्याचा निर्णय घेतला.
 
विविध संस्थांकडून मदतीचा ओघ 
 
मंचर : माळीण दुर्घटनेनंतर बचावकार्य व मदतीचे काम करणा:या अनेक संस्थांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. पराग उद्योग समूहाच्या वतीने आठ दिवसांत सुमारे 25 हजार व्यक्तींना अन्न-पाणी पुरविण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणो तसेच स्वच्छतेचे काम केले. आजही त्यांचे काम सुरूच होते.
माळीण दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन काही वेळातच तेथे पोहोचले. त्यानंतर असंख्य हात कामाला लागले. अशा दुर्गम भागात भोजन व पिण्याचे पाणी पोहोचविणो तसे जिकिरीचे होते. मात्र, देवेंद्र शहा यांच्या पराग उद्योग समूहाने ही जबाबदारी पेलली आहे. माळीण गावापासून थोडय़ाशा अंतरावर असणा:या शाळेपुढे तात्पुरता मंडप उभारून भोजन तयार करण्याचे काम सुरू झाले. बुधवारी घटना घडली. त्यानंतर काही वेळातच काम करणा:या जवानांच्या हातात पाणी व खाद्य होते. त्यामुळे आठवडाभरात काम करणो एमडीआरएफच्या जवानांना शक्य झाले.
अरविंद देसाई व अशोक निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली 4क् जण अहोरात्र हे काम करतायेत. याबाबत माहिती देताना देसाई म्हणाले, ‘‘येथे तयार होणारे अन्न पाच ठिकाणी पोहोचविले जाते. माळीण येथील घटनास्थळी जवानांना जेवण पोहोच केले जाते. रात्री काम करताना त्यांना चहाची व्यवस्था होते. अडीवरे येथील आरोग्य उपकेंद्र आसाणो आदी ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे. येथे असणारे सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ, पोलीस यांना भोजनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. पोटभर भोजन दिले जाते. 7 वाहनांद्वारे साहित्य मंचर येथून माळीणला पोचविले जाते.
एनडीआरएफचे जवान दिवसरात्र काम करताहेत. त्यांना एनर्जी यावी यासाठी पनीर, तूप विशेष करून देण्यात आले. यूएसटी दूध पुरविण्यात आले. येथील काम सुरू असेर्पयत भोजन व पाणी पुरविले जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. (वार्ताहर)
 
स्वयंसेवा संस्थांची विशेष मदत 
संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर (ता. बार्शी टाकळी, जि. अकोला) येथील 13 जणांचे पथक विशेष काम करीत आहे. अध्यक्ष दीपक सदाकळे यांच्यासमवेत असणारे हे तरुण केवळ मदतीचे काम करत होते. मृतदेहांवर अंत्यविधी करणो, परिसरात पडलेला कचरा हटविणो हे काम ते करताना दिसले. आज दोन जनावरे मिळाली. त्यांची विल्हेवाट लावल्याचे सदाफळे यांनी सांगितले. या पथकाने केदारनाथ येथेही 21 दिवस मदतकार्य केले होते. एकाच वेळी 7 मृतदेह आम्ही वाहिले आहेत. आताच नऊ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून आल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5क् कार्यकर्ते दिवसभर काम करत होते. तेही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणो तसेच स्वच्छतेचे काम करीत आहेत. 
 

Web Title: Accident due to water accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.