नगर रस्ता बीआरटी मार्गावर उद्घाटनाआधीच अपघात

By Admin | Published: April 28, 2016 12:48 AM2016-04-28T00:48:49+5:302016-04-28T00:48:49+5:30

वर्दळीच्या नगर रस्त्यावर महापालिकेकडून प्रवासी तसेच इतर वाहतुकीची सुनियोजित यंत्रणा उभारण्याआधीच बीआरटी सेवा सुरू करण्याची घाई सुरू आहे.

Accident before the inauguration on the city road BRT road | नगर रस्ता बीआरटी मार्गावर उद्घाटनाआधीच अपघात

नगर रस्ता बीआरटी मार्गावर उद्घाटनाआधीच अपघात

googlenewsNext

पुणे : वर्दळीच्या नगर रस्त्यावर महापालिकेकडून प्रवासी तसेच इतर वाहतुकीची सुनियोजित यंत्रणा उभारण्याआधीच बीआरटी सेवा सुरू करण्याची घाई सुरू आहे. या मार्गाचे गुरुवारी (दि. २८) उद्घाटन होणार असतानाच बुधवारी पहाटे या मार्गावर टाटा गार्डरूमजवळील बसथांब्याजवळ बीआरटी मार्गात कार उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात चौकातून पायी जाणारा पादचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती पोलिसांकडे नसली तरी पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेस दुजोरा दिला असून, बीआरटी सुरू झाल्यानंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संबंधित कारचालक हा नगरकडे निघाला असताना टाटा गार्डरूमजवळ बीआरटी मार्गातून पुढे जाताना, स्थानकातून प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी रस्त्यावर लावण्यात आलेल्या स्टिलच्या बोलार्डचा कारचालकास अंदाज आला नाही. त्यामुळे बोलार्डला धडक बसून कार रस्त्यावर पलटी झाली. या वेळी कारचा धक्का लागून एक जण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या मार्गावर सुरक्षा नियमांनुसार, बसथांब्याचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच प्रवासी स्थानकातून बाहेर पडल्यानंतर मुख्य रस्ता ओलांडण्यासाठी या मार्गावर विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावरील संचलन तातडीने थांबवावे, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केली आहे. या मार्गाचे तसेच बसस्थानकांचे कोठेही सुरक्षा आॅडिट झाले नसल्याने आधी आॅडिट करून सुरक्षा त्रुटी दूर कराव्यात; त्यानंतरच संचलन सुरू करावे, अशी मागणी राठी यांनी केली आहे. संघटनेच्या वतीने मंगळवारी या मार्गाची पाहणी केली असता, टर्मिनलचे अर्धवट काम, बसथांब्यांवर आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित नसणे, बीआरटी मार्गावर मुख्य चौकांमध्ये तोडण्यात आलेले दुभाजक, बसस्थानकांचे स्वयंचलित दरवाजे बंद असणे, बसस्थानकांवर कायमस्वरूपी विद्युतपुरवठा नसणे अशा एक ना अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे घाईगडबडीने हा मार्ग सुरू करण्यात येऊ नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Web Title: Accident before the inauguration on the city road BRT road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.