ट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळे टळला कोकण रेल्वेवरील अपघात

By admin | Published: November 10, 2014 09:35 AM2014-11-10T09:35:59+5:302014-11-10T11:41:26+5:30

रेल्वे रुळ तुटल्याचे लक्षात येताच ट्रॅकमनने धाव घेत एक्स्प्रेस थांबवली व मोठा अपघात टळला.

Accident on Konkan Railway due to delayed traffic congestion | ट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळे टळला कोकण रेल्वेवरील अपघात

ट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळे टळला कोकण रेल्वेवरील अपघात

Next
>ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. १० - कोकण रेल्वेमार्गावरील एका ट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसचा अपघात टळला आहे. सचिन पाडावे असे त्या ट्रॅकमनचे नाव असून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रत्नागिरी तालुक्यातील लाजुळ येथील एका पुलावर रेल्वेचा ट्रॅक तुटला असल्याचे पाडावे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित रेल्वे कंट्रोल रुम व उक्षी स्टेशनला त्याची माहिती दिली मात्र तोपर्यंत उक्क्षी स्टेशनवरून कोकणकन्या एक्स्प्रेस सुटली होती.  
ताशी ७५ किमी वेगाने येणा-या कोकण कन्या एक्स्प्रेसला थांबवणे गरजेचे होते. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करत सचिन तुटलेल्या ट्रॅकपासून उक्षी स्टेशनच्या दिशेने धावत सुटलेेे आणि हातातील बॅनरने उक्षीच्या बोगद्याजवळ व तुटलेल्या ट्र२कच्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरावर कोकण कन्या एक्स्प्रेस थांबवली व अपघात टाळला. जर पाडवे यांनी प्रसंगावधान दाखवत एक्स्प्रेस थांबवली नसती तर ती पुलावरून थेट खाली नदीत कोसळली असती व मोठी दुर्घटना झाली असती. 

Web Title: Accident on Konkan Railway due to delayed traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.