Accident: आमदार योगेश कदम यांच्या कारला भीषण अपघात, कशेडी घाटात डंपरने दिली धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 11:48 PM2023-01-06T23:48:02+5:302023-01-07T00:03:33+5:30

MLA Yogesh Kadam Car Accident: शिंदे गटातील आमदार आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटामध्ये अपघात झाला आहे. योगेश कदम हे खेड येथून मुंबईकडे येत असताना त्यांच्या कारला डंपरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

Accident: MLA Yogesh Kadam's car was hit by a dumper in Kashedi Ghat | Accident: आमदार योगेश कदम यांच्या कारला भीषण अपघात, कशेडी घाटात डंपरने दिली धडक

Accident: आमदार योगेश कदम यांच्या कारला भीषण अपघात, कशेडी घाटात डंपरने दिली धडक

googlenewsNext

मुंबई - शिंदे गटातील आमदार आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटामध्ये अपघात झाला आहे. योगेश कदम हे खेड येथून मुंबईकडे येत असताना त्यांच्या कारला डंपरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

योगेश कदम हे शिंदे गटातील आमदार आहे. योगेश कदम हे आज त्यांच्या निवासस्थानी आले होते. तिथे काही कार्यकर्त्यांचा त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला होता. त्यानंतर ते मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी त्यांची कार कशेडी घाटात आली असताना त्यांच्या कारला डंपरने घडक दिली. त्यामुळे योगेश कदम यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली. तर त्यांच्या कारचा ड्रायव्हर आणि सुरक्षेतील पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. 

आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूरनजीक चोळई येथे मागून येणा-या टँकरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि टँकर चालक घटनास्थळावरुन पळून गेला. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली . यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करित आहेत.

Web Title: Accident: MLA Yogesh Kadam's car was hit by a dumper in Kashedi Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.