मोहोळ- सोलापूर रस्त्यावर अपघात, ४ ठार

By admin | Published: March 21, 2016 11:32 AM2016-03-21T11:32:41+5:302016-03-21T11:33:08+5:30

मोहोळ-सोलापूर मार्गावर झालेल्या अपघातात एका वाहनाने २५ जणांना चिरडलं असून त्यात ४ जण मृत्यूमुखी पडले

Accident on Mohol-Solapur road, 4 killed | मोहोळ- सोलापूर रस्त्यावर अपघात, ४ ठार

मोहोळ- सोलापूर रस्त्यावर अपघात, ४ ठार

Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २१ - मोहोळ-सोलापूर मार्गावर झालेल्या अपघातात एका वाहनाने २५ जणांना चिरडलं असून त्यात ४ जण मृत्यूमुखी पडले. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सर्व मृत वडाळा गावचे रहिवासी होते. 
आज सकाळी काही नागरिकांची दिंडी मोहोळ-सोलापूर मार्गावरून जात असताना भरधाव वेगाने आलेले एक वाहन त्या दिंडीत घुसले आणि २५ जण जखमी झाले. त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Accident on Mohol-Solapur road, 4 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.