मुंबई-गोवा महामार्गावर अपघात
By admin | Published: May 9, 2016 03:32 AM2016-05-09T03:32:41+5:302016-05-09T03:32:41+5:30
दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार, तर दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलादपूर : दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार, तर दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर लोहारे गावच्या हद्दीत सिद्धिविनायक पेट्रोलपंपासमोर रविवारी दुपारी हा अपघात घडला.
नाशिकचे रहिवासी संदीप सहस्रबुद्धे (५०) हे पत्नी चित्रा (४५), मुलगा अनिकेत (२०) आणि मेहुणी लक्ष्मी कुलकर्णी (४०), मेहुणीचा मुलगा पीयुष कुलकर्णी (१७) यांना घेऊन स्विफ्ट कारने मुंबई-गोवा महामार्गावरून चिपळूण येथे होते. चिपळूणहून मुंबईकडे येणाऱ्या वॅगनार कारशी त्यांची लोहारे गावाजवळ जोरदार धडक झाली. या अपघातात वॅगनार कारचा चालक प्रसाद मदनाथ (४५) आणि रेश्मा नरवडे (४०) हे दोघे जागीच ठार झाले, तर श्रृती मदनाथ (४०), वामनराव नरवडे (४५) हे गंभीर जखमी झाले असून, दोन वर्षांचा शौर्य प्रसाद मदनाथ हाही अत्यवस्थ आहे. स्विफ्ट कारमधील अनिकेत सहस्रबुद्धे, पीयुष कुलकर्णी, लक्ष्मी कुलकर्णी, चित्रा सहस्रबुद्धे आणि संदीप सहस्रबुद्धे हे पाच जण गंभीर जखमी आहेत. या सर्वांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी चिपळूण व मुंबई येथे हलविण्यात आले आहे.