नान्नज हद्दीत अपघात, दोघां कारागिरांचा मृत्यू
By admin | Published: May 9, 2016 11:57 PM2016-05-09T23:57:15+5:302016-05-09T23:57:15+5:30
मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात दोघा युवा सराफ व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली़
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 9- नान्नज-वडाळा (ता़उ़सोलापूर)हद्दीत मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात दोघा युवा सराफ व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली़
गणेश सुकुमार रॉय (वय २४, रा़ गडगी नगर, प्लॉट नंबर ६, युनिक अपार्टमेंट, सोलापूर) व उस्मान हुसेन मंडल (वय २५ रा़ भवानी पेठ, धोंगडे वस्ती, सोलापूर) अशा मृत्यू झालेल्या सराफांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सराफ बाजाराला सुट्टी असल्यानं करमाळा तालुक्यतील आवाटी येथील दर्ग्याचे दर्शन घेण्याकरिता गणेश व उस्मान हे दोघे सराफ कारागीर गेले होते़ या दर्ग्याचे दर्शन घेऊन बार्शीमार्गे सोलापूरकडे परत येत असताना नान्नज येथील वळणावर मोटारसायकल स्लीप झाल्याने हे दोघेही गाडी पडले. यावेळी दोघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे मूळचे पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील सुवर्ण कारागीर आहेत. ते गेल्या दहा वर्षांपासून सोलापूर येथील सराफ बाजारात सुवर्ण कारागीरांचा व्यवसाय करतात. या घटनेची माहिती मिळताच महिला पोलीस निरीक्षक अमृता पटाईत, पोहेकॉ गुंड आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची पाहणी केली़ त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.