बाप्पांना आणते वेळी झाली दुर्घटना, दोन गणेश भक्तांचा मुत्यू

By admin | Published: August 30, 2016 01:21 AM2016-08-30T01:21:36+5:302016-08-30T01:21:36+5:30

शहरातील जय माता दी मंडळाचे गणेश भक्त बाप्पांना वाजत-गाजत आणत होते. यावेळी उच्च दाबाच्या विघुत वाहिणीचा जोरदार धक्का हितेश तलरेजा व हितेश सचदेव या अल्पवयीन गणेश भक्तांना बसला

The accident occurred at the time of bringing the parents, the death of two Ganesh devotees | बाप्पांना आणते वेळी झाली दुर्घटना, दोन गणेश भक्तांचा मुत्यू

बाप्पांना आणते वेळी झाली दुर्घटना, दोन गणेश भक्तांचा मुत्यू

Next

सदानंद नाईक, उल्हासनगर
शहरातील जय माता दी मंडळाचे गणेश भक्त बाप्पांना वाजत-गाजत आणत होते. यावेळी उच्च दाबाच्या विघुत वाहिणीचा जोरदार धक्का हितेश तलरेजा व हितेश सचदेव या अल्पवयीन गणेश भक्तांना बसला. ते खाली कोसळून जागीच त्यांचा मुत्यू झाला. तर ४४ वषाचे सुनिल गंभीररित्या भाजले आहे. त्यांच्यावर मिरा हॉस्पीटल मधिल अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३ दसरा मैदान विभागातील मनिषनगर येथे जेएमडी गणेश मंडळ आहे. मंडळाचे पदाधिका-यासह कार्यकर्ते बाप्पाची उंच मुर्ती रात्रीचे ९ वाजण्याच्या दरम्यांन घेवून येत होते. टॅनिंग पॉईट येथे बाप्पा आल्याने त्यांच्या उंच मुर्तीचा संपर्क उच्च दाबाच्या विघुत वाहिणी सोबत आला. बाप्पाच्या मुर्ती जवळ उभे असलेले १५ व १६ वर्षाचे हितेश सचदेव व हितेश तलरेजा यांना जोरदार विजेचा धक्का बसल्याने ते कोसळून जागीच मुत्यू झाला आहे. तसेच सुनिल नावाचा पदाधिकारी गंभीररित्या भाजले आहे.
हितेश सचदेव व हितेश तलरेजा यांचा मुत्यू झाल्याची माहिती नागरिकांना मिळताच ते रस्त्यावर उतरले आहे. कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्त सुनिल भारद्बाज यांनी परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला. बाप्पांना आणते वेळी उच्च दाबाच्या उच्च विघुूत वाहिणीचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला तर सुनिल नावाचा इसम गंभीर जखंमी झाले आहे. विघुत मंडळाच्या कारभारा बाबत नाराजी व्यक्त होत असून मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

आमदार ज्योती कालानी, माजी आमदार कुमार आयलानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट देवून दुघटनेची पाहणी केली आहे. तसेच उंच बाप्पाच्या मुर्त्यामुळे सावधगिरी साधण्याचाघटनेचा निषेध केला आहे. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असून पोलिस अधिक गुन्हा दाखल केल आहे. तसेच शिवसेना शहरप्रमुखासह अन्य जणांनी शिवसेनेच्या मदतीने मदत लावण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

Web Title: The accident occurred at the time of bringing the parents, the death of two Ganesh devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.