कार झाडावर आदळल्याने अपघात, दोन जणांचा मृत्यू

By admin | Published: July 17, 2017 05:43 PM2017-07-17T17:43:35+5:302017-07-17T17:43:35+5:30

ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव कार रोडच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.

Accident, two deaths due to collapsing on a car tree | कार झाडावर आदळल्याने अपघात, दोन जणांचा मृत्यू

कार झाडावर आदळल्याने अपघात, दोन जणांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 17 : ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव कार रोडच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यात महिलेचा घटनास्थळीच तर दुसऱ्या उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान - तारसा मार्गावरील बोरी फाट्याजवळ सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
मंदा दिलीप बगमारे (५०) व सेवकराम हरिश्चंद्र अलोणे (५०) दोघेही रा. नागपूर अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये लक्ष्मण शिकरे (५७) व तातोजी नागतोडे (६५) दोघेही रा. नागपूर यांचा समावेश आहे. सेवकराम अलोणे यांचे मोठे भाऊ ज्ञानेश्वर अलोणे, रा. हिवरा, ता. मौदा यांचे निधन झाल्याने त्याच्या चौदावीचा कार्यक्रम असल्याने चौघेही एमएच-४९/बी-४२१३ क्रमांकाच्या कारने कन्हान मार्गे हिवरा येथे जात होते. दरम्यान, बोरी शिवारातील नाल्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार रोडच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. त्यात कारमधील चौघेही गंभीर जखमी झाले. त्यातच मंदा बगमारे यांचा काही वेळातच घटनास्थळी मृत्यू झाला.
या मार्गाने जाणाऱ्यांनी या घटनेची माहिती लगेच कन्हान पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तिन्ही जखमींना लगेच कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे सेवकराम अलोणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंदा बगमारे या सेवकराम अलोणे यांची आतेबहीण होय. अन्य दोन जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Accident, two deaths due to collapsing on a car tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.