अपघातास शिक्षकांना जबाबदार धरणार

By admin | Published: February 6, 2016 02:21 AM2016-02-06T02:21:03+5:302016-02-06T02:21:03+5:30

शाळा वा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहलीदरम्यान शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्यास त्यास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य वा मुख्याध्यापक आणि सहलीबरोबर असणाऱ्या शिक्षकांना जबाबदार धरण्यात येणार

Accident will be responsible for teachers | अपघातास शिक्षकांना जबाबदार धरणार

अपघातास शिक्षकांना जबाबदार धरणार

Next

मुरुड : शाळा वा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहलीदरम्यान शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्यास त्यास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य वा मुख्याध्यापक आणि सहलीबरोबर असणाऱ्या शिक्षकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच शिक्षण विभागामार्फत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
पुणे येथील आबेदा इनामदार महाविद्यालयातील चौदा विद्यार्थ्यांना मुरुड-जंजिरा येथे जीव गमवावा लागला. अशा घटना घडू नयेत म्हणून शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सहलीसाठी घ्यावयाची खबरदारी आणि नियमांचे परिपत्रक जारी केले आहे. सहलीसाठी त्याचे पालन करणे प्रत्येक शाळेवर आता बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत हेळसांड झाल्यास, त्यांना शारीरिक व मानसिक त्रास झाल्याची तक्रार पालकांनी केली तर त्यास जबाबदार शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना कारवाईला सामोरे जावे लागले.
सहलीसाठी नियमावली दिली. त्यात समुद्रकिनारे, अतिजोखमीची पर्वतांवरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी, उंच टेकड्या आदि ठिकाणी शैक्षणिक सहली काढू नयेत, दोन प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहलीबाबत आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचावासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे,सहलीबरोबर प्रथमोचार पेटी वा ज्या ठिकाणी सहल जाणार तेथील शासकीय रुग्णालये आणि डॉक्टरांचे संपर्क क्रमांक बरोबर असावेत, सहलीचा आराखडा पालकांपर्यंत पोचवावा. त्यांच्या सूचनांची दखल घ्यावी. गरज भासल्यास सहलीबरोबर पालकांचा एक प्रतिनिधी पाठवावा,सहलीपूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच सहलीच्या ठिकाणी असलेली भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणानुसार घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन शाळांनी विद्यार्थ्यांना केले पाहिजे, सहलीसाठी एसटी बस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची मान्यता दिलेल्या बसेस वापराव्यात, दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक पाठवावा. विद्यार्थ्यांना एकटे वा नजरेआड फिरण्यास सोडू नये, शिक्षकांनी तंबाखू, गुटखा आणि अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये, विद्यार्थ्यांना मोबाइल फोन वापरण्याची मुभा द्यावी. त्यांना पालकांच्या संपर्कात राहण्याची सूचना द्यावी,माध्यमिक विद्यार्थ्यांना ट्रेकिंग, जलक्रीडा इ.साठी परवानगी देवू नये आदी नियमांचा समावेश आहे. (वार्ताहर)शैक्षणिक सहलीचा कालावधी हा एक मुक्कामापेक्षा अधिक काळ असू नये,राज्याबाहेर सहल काढण्यास शिक्षण विभागाकडून परवानगी मिळणार नाही,सहलीत विद्यार्थिनींचा सहभाग असेल तर एक महिला शिक्षिका आणि एक महिला पालकप्रतिनिधी सोबत नेणे बंधनकारक राहील, विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबर कोणतेही गैरवर्तन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल आदींचा या नियमावलीत समावेश आहे.

Web Title: Accident will be responsible for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.