सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचे अपघाती निधन
By admin | Published: May 14, 2016 07:01 PM2016-05-14T19:01:30+5:302016-05-14T19:01:30+5:30
भारतीय सीमा सुरक्षा दलात छत्तीसगड येथे सेवेत असलेला न्यायडोंगरी येथील जवान किरण बाळासाहेब अहेर (२६) या जवानाचे अपघाती निधन झाले.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
न्यायडोंगरी, दि. १४ - भारतीय सीमा सुरक्षा दलात छत्तीसगड येथे सेवेत असलेला न्यायडोंगरी येथील जवान किरण बाळासाहेब अहेर (२६) या जवानाचे अपघाती निधन झाल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली.
सुमारे तीन वर्षा पूर्वी किरण अहेर सुरक्षा दलात भरती झालेला होता. दुचाकीवरून पडल्याने त्यात त्यांच्या छातीस जबर मार लागल्याने तातडीने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यु झाला.
किरण यांचा वर्षापूर्वीच विवाह झाला होता लग्नाच्या प्रथम वाढिदवसाला अगदी दोन दिवस बाकी असतांना काळाने झडप घातली अन किरणला पत्नी कुटुंबापासून हिरावुन घेतला. किरणच्या निधनाची बातमी परिसरात कळताच नागरिकांनी घराकडे धाव घेतली. या वेळी परिसरातील भारतीय जवानांनी किरण यास अखेरची मान वंदना देवून अंत्यविधि करण्यात आला.
या वेळी गावातील व्यापा-यांनी आपली दुकांनी बंद ठेऊन व्यवहार बंद ठेवले होते. किरण यांच्या पश्चात आई वडील पत्नी भाऊ बहिण असा परिवार आहे.