पाच महिला वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू
By admin | Published: July 3, 2016 04:30 AM2016-07-03T04:30:53+5:302016-07-03T04:30:53+5:30
वारकऱ्यांच्या टेम्पोला मालट्रकने टक्कर दिल्याने पाच महिला वारकरी जागीच मृत्युमुखी पडल्या, तर १२ वारकरी जखमी झाले. ते सर्व नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
करमाळा (जि. सोलापूर) : वारकऱ्यांच्या टेम्पोला मालट्रकने टक्कर दिल्याने पाच महिला वारकरी जागीच मृत्युमुखी पडल्या, तर १२ वारकरी जखमी झाले. ते सर्व नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. भागवत एकादशीनिमित्त पंढरपुरातून पांडुरंगाचे दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ््यात परतताना शनिवारी शेलगाव गावाजवळ अपघात झाला. यामुळे वारीवर शोककळा पसरली.
त्र्यंबकेश्वरहून पालखी पंढरपुरला निघाली आहे. वीस हजार वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या हा पालखीचा शुक्रवारी अहमदनगरला मुक्काम होता. दिंडीतील १६ भाविक टेम्पोतून पंढरीस गेले होते़ विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण परतत होते. टेम्पोतील अंजनाबाई भगत, तुळसाबाई शेळके, हिराबाई गुळवे, लक्ष्मीबाई चव्हाण, जिजाबाई बिन्नर या जागीच मरण पावल्या़ तर चांगुणाबाई दुबासे, हौसाबाई सदरक, शोभा चव्हाण, मीनाबाई सदगिरे या जखमी आहेत. (वार्ताहर)