स्वत: तयार केलेल्या हेलिकॉप्टरची चाचणी घेताना झाला भीषण अपघात, ध्येयवेड्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 11:00 AM2021-08-11T11:00:05+5:302021-08-11T13:08:56+5:30

Accident News: एका ध्येयवेड्या तरुणांच्या त्याने मनात असलेले ध्येय पुर्ण करता करता त्यातच त्याचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला. 

The accidental death of a heroic young man, the dream of making a helicopter remained unfulfilled | स्वत: तयार केलेल्या हेलिकॉप्टरची चाचणी घेताना झाला भीषण अपघात, ध्येयवेड्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

स्वत: तयार केलेल्या हेलिकॉप्टरची चाचणी घेताना झाला भीषण अपघात, ध्येयवेड्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext

- विवेक पांढरे
यवतमाळ - फुलसावंगी येथील एका ध्येयवेड्या तरुणांच्या त्याने मनात असलेले ध्येय पुर्ण करता करता त्यातच त्याचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला. शेख इस्माईल उर्फ मुन्ना हेलिकॉप्टर शेख इब्राहिम (वय २८ वर्षे)  या नावाने परिसरात प्रसिद्ध असलेल्या ध्येय वेड्या तरुणाने मागील तिन चार वर्षा पासुन तो सिंगल सिट हेलिकॉप्टर तयार करण्याचे ध्येय उराशी बाळगून, आपले कुटुंब चालवण्यासाठी दिवसभर स्वतः च्या वेल्डिंगच्या दुकानात कुटुंब चालवण्यासाठी काम करायचा व रात्रीला आपले ध्येय आहे ते पुर्ण करण्यासाठी तो हेलिकॉप्टर तयार करण्याचे काम करत होता. (The accidental death of a heroic young man, the dream of making a helicopter remained unfulfilled)

त्याचे शिक्षण हे फक्त ९ वी पर्यंत झालेले होते. आपल्या कल्पनाशक्ती व अजोड कलेच्या भरोश्यावर हेलिकॉप्टर तयार करण्याचे धाडस त्याने केले होतो. मुन्ना ने हेलिकॉप्टरमध्ये मारोती ८०० चे इंजिन वापरुन सिंगल सिट हेलिकॉप्टर बनवुन पुर्णत्वास ही नेले होते.येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रात्यक्षिक घेऊन "पेटेंट" मिळवायची त्याची तयारी झाली होती परंतु नियतीला हे मंजुर नव्हते काल मंगळवारी रात्री १:३० मी. अंदाजे एकदा त्याने बनवलेल्या हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक घेण्याचे त्याने ठरवले आणि प्रात्यक्षिक घेत असतांनाच हेलिकॉप्टर च्या मागच्या पंख्यात बिघाड येउन तो पंखा तुटुन वरच्या फिरणाऱ्या मोठ्या पात्यावर आदळला आणि येथेच सर्व खेळ बिघडुन नियतीने घात केला. मागचा पंखा मोठ्या पात्यावर आदळल्याने ते पाते तुटुन त्याचा समतोल बिघडुन ते मोठे पाते कॅबिन मध्ये बसलेल्या शेख इस्माईल उर्फ मुन्ना हेलिकॉप्टर याच्या डोक्यावर जोरदार आदळले यामध्ये त्याच्या डोक्याला मोठी इजा झाल्याने त्याला उपचारासाठी पुसदला असतांनाच दुर्दैवाने त्याची प्राणज्योत मालवली अशा प्रकारे आपले ध्येय पुर्ण करता करताच ध्येयवेड्या शेख इस्माईलचा मृत्यु झाला.त्याच्या पश्चात वडिल, आई, एक भाऊ , बहिणी असा मोठा आप्त परिवार आहे. त्याच्या अशा जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: The accidental death of a heroic young man, the dream of making a helicopter remained unfulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.